शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

धोका वाढला! आता कोरोना विषाणू कधीही पाठ सोडणार नाही; WHO नं दिली धोक्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 12:12 PM

CoronaVirus News : WHO च्या आपातकालिन विभागाचे प्रमुख डॉक्टर माईक रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस आता वेगाने पसरत आहे.

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या प्रसाराबाबत मोठं विधान केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पू्र्णपणे नष्ट  होणं शक्य नाही.  WHO च्या आपातकालिन विभागाचे प्रमुख डॉक्टर माईक रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस आता जगभरात वेगाने पसरत आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार जिनिव्हाधील ऑनलाईन बैठकीत त्यांनी सांगितले की, अशा स्थितीत कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होईल असं वाटत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार  रोखून जगाला पुन्हा लॉकडाऊनसारख्या स्थितीत जाण्यापासून रोखता येऊ शकते.  काही ठिकाणी पुन्हा  लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही कारण कोरोना विषाणूंचा प्रसार वेगाने वाढत आहे.

आयलँडसह अनेक देशांनी कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहे. पण संक्रमणाचा धोका कमी झालेला नाही. WHO  तील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शतकातून एकदा येत असलेल्या या माहामारीचा वेग प्रचंड वाढत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळालेलं नाही. दरम्यान देशातील कोरोना रुग्णांनी नवीन उच्चांक गाठला असून आता धडकी भरवणार आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 27,114 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 519 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने 22,123 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 8,20,916 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 

कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी आत्तापर्यंत गंभीर आजारात वापरात असेलेल्या औषधांचा वापर केला जात होता. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवर लस आणि औषध  शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. तर भारतातील फार्मा बायोटेक, अमेरिकेतील मॉडर्ना आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची लस अंतीम टप्प्यात आहे.

coronavirus: सिप्लाने बनविले कोरोनावरील जगभरातले सर्वात स्वस्त जेनेरिक औषध

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना