शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

खुशखबर! ८० टक्के कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतरांना संसर्गाचा धोका नाही, संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 1:52 PM

CoronaVirus News & Latest Updates : जीवघेणा व्हायरसने संक्रमित असलेल्या ८० टक्के लोकांकडून इतरांना संक्रमण होण्याचा धोका कमी असतो. २० टक्के कोरोनाचे रुग्ण हे 'सुपर स्प्रेडर' असतात. 

जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची सुरूवात झाल्यानंतर वैज्ञानिक आणि  जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी अनेक दावे केले होते. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनंतर लोकांना सर्तकता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. असाच एक रिसर्च अमेरिकेत सुद्धा झाला होता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जीवघेणा व्हायरसने संक्रमित असलेल्या ८० टक्के लोकांकडून इतरांना संक्रमण होण्याचा धोका कमी असतो. २० टक्के कोरोनाचे रुग्ण हे 'सुपर स्प्रेडर' असतात. या सकारात्मक माहितीमुळे तज्ज्ञांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

अमेरिकेतील फ्रेट हचिंसन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या एका संशोधनात दिसून आलं की, कोविड १९  सुपर स्प्रेडरच्या माध्यमातून पसरतो. कोरोना संक्रमित लोकांमध्ये केवळ २० टक्के रुग्ण असे असतात जे इतरांना संक्रमित करतात. संशोधकांच्या टीमचे प्रमुख तज्ज्ञ शिफर फ्रेड हच पोस्टडॉक्टोरल, आशीष गोयल आणि ब्रायन मेयर यांनी सांगितले की, या व्हायरसची तुलना सामन्य फ्लू शी करण्यासाठी एक कंम्प्यूटर मॉडेल तयार करण्यात आलं आहे. 

या संशोधनात असं दिसून आलं की  कोविड १९ ने रुग्ण जास्त प्रमाणात संक्रमित असेल तर व्हायरस पसरण्याचा धोका असतो. चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी नकळतपणे व्हायरसचा प्रसार होतो. संशोधनातून दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसनं संक्रमित रुग्णामुळे अनेक आठड्यांपर्यंत कमी प्रमाणात व्हायरसचा प्रसार होतो. तर दोन दिवसांमध्ये एक ते दोन व्यक्तींनाच संक्रमित करू शकतो.

सुपर स्प्रेडर कशाला म्हणतात

सुपर स्प्रेडर ज्यावेळी असतो तेव्हा संक्रमित व्यक्ती आपल्या पीक कॉन्टॅगियस पॉइंटवर असतो. तसंच लोकांमध्ये उठणं बसणं सुरू असतं.  त्यावेळी तो इतरांना संक्रमीत करू शकतो. त्याचप्रमाणे कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोनाचं संक्रमण झालेलं असतं. पण इतरांना नाही. म्हणजेच पॉझिटिव्ह व्यक्ती 'पीक कॉन्टॅगियस पॉइंट' नव्हता. संशोधकांनी लाखोंच्या संख्येत कंम्प्युटर सिम्युलेशन चालवले आणि त्याआधारीत एका डेटाची तुलना केली. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेकडून या बातमीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

संक्रमणापासून बचावासाठी मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टेंसिंग पाळणं तसंच गर्दीच्या ठिकाणी न जाणंच फायद्याचे  ठरेल. दरम्यान कोरोनाची लस शोधण्यासाठी जगभरातील तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग हा प्रभावी पर्याय समजला जात आहे. 

(टीप- जागतिक आरोग्य संघटनेकडून या बातमीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  कोरोनाबाधित  रुग्णांवर आधारीत हा रिसर्च करण्यात आला होता. या रिसर्चमधून सकारात्मक माहिती समोर आली आहे.)

हे पण वाचा 

निरोगी राहण्यासाठी रोज किती चालायला हवं? जाणून घ्या ५ ते ६० वर्ष वयोगटाचा प्रभावी 'वॉक प्लॅन'

भारतामध्ये चौथ्या कोरोना प्रतिबंधक लसीचेही उत्पादन

युद्ध जिंकणार! शरीरातील कोरोना प्रसाराला रोखणार 'वॅकिओलिन' आणि 'एपिलिमोड' ही दोन औषधं, तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य