Covid-19 Delta Plus: काय आहे कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लस, याला खरंच घाबरण्याची गरज आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 01:01 PM2021-06-17T13:01:13+5:302021-06-17T13:01:29+5:30

वैज्ञानिकांनी सांगितलं की, यावर्षी ज्या व्हेरिएंटमुळे भारतात कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट आली होती. त्याला जबाबदार डेल्टा व्हेरिएंट आहे

Coronavirus : New variant delta plus, All you need to know | Covid-19 Delta Plus: काय आहे कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लस, याला खरंच घाबरण्याची गरज आहे का?

Covid-19 Delta Plus: काय आहे कोरोनाचा नवा व्हेरिएंट डेल्टा प्लस, याला खरंच घाबरण्याची गरज आहे का?

Next

२०२० सोबतच २०२१ मध्येही कोरोनाचं थैमान सुरूच आहे. भारतासहीत जगभरातील अनेक देशांना कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. गेल्या एक वर्षात कोरोना व्हायरस अनेकदा म्यूटेट झाला आहे. म्हणजे त्याने अनेकदा रूप बदललं आहे. आता पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. ज्यामुळे भारतातील लोकांची चिंता वाढली आहे. वैज्ञानिकांनी सांगितलं की, या नव्या व्हेरिएंटचं नाव डेल्टा प्लस आहे आणि हा डेल्टा B.1.617.2 चा व्हेरिएंटचा म्यूटेट आहे ज्याला  'AY.1' असंही म्हटलं जातं. 

वैज्ञानिकांनी सांगितलं की, यावर्षी ज्या व्हेरिएंटमुळे भारतात कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट आली होती. त्याला जबाबदार डेल्टा व्हेरिएंट आहे. भारतात हा चिंतेचा विषय बनला आहे. पण याबाबत काही पुरावा देण्यात आला नाही की, नवा व्हेरिएंट किती नुकसानकारक ठरू शकतो. (हे पण वाचा : Covaxin घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोविशिल्डच्या यादीत घेण्यासाठी WHO सोबत बैठक ठरली)

व्या व्हेरिएंटची किती माहिती उपलब्ध आहे?

टाइम्स नाउच्या एका रिपोर्टनुसार, तज्ज्ञ सांगतात की, K417N म्यूटेट झाल्यावर B.1.617.2 व्हेरिएंट तयार झाला होता. याला AY.1 असंही म्हटलं जातं. तज्ज्ञांनी सांगितलं की, हा नवा व्हेरिएंट सार्स-सीओव्ही-२ चा स्पाइक प्रोटीन आहे जो मनुष्यांच्या सेलच्या आत शिरून त्यांना इन्फेक्ट करतो. भारतात K417N ची फ्रीक्वेन्सी सध्या जास्त नाही. पण यूरोप, आशिया आणि अमेरिकेत या व्हेरिएंटचा धोका अधिक आहे. हा व्हेरिएंट सर्वातआधी यूरोपमध्ये यावर्षी मार्चमध्ये आढळून आला होता.

औषधांचा किती प्रभाव होतो?

तज्ज्ञ सांगतात की, डेल्टा प्लस भारतात कोविड-१९ साठी ऑथराइज्ड मोनोक्लोनल अ‍ॅंटीबॉडी कॉकटेलचा प्रतिरोधी आहे. नुकतीच सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून Casirivimab आणि Imdevimab च्या कॉकटेलला इमरजन्सी वापरासाठी परवानगी मिळाली होती. भारतात हे कॉकटेल बनवणारे  Roche India आणि Ciplas ने या एंटीबॉडी कॉकटेलचे भाव एका डोजसाठी साधारण ६० हजार रूपये ठरवला आहे.

मोनोक्लोनल अ‍ॅंटीबॉडीज लॅबमध्ये आर्टिफिशिअल पद्धतीने तयार केल्या जातात ज्या या डिजीज विरोधात प्रभावी ठरतात. Casirivimab आणि Imdevimab चे मोनोक्लोनल अ‍ॅंटीबॉडीज या व्हायरसला मनुष्याच्या शरीरात प्रवेश करण्यापासून ब्लॉक करतात. 

किती संक्रामक आहे हा नवा व्हेरिएंट?

हा नवा व्हेरिएंट किती संक्रामक आहे हे जाणून घेणं फार गरजें आहे. तज्ज्ञांचं मत आहे की, या नव्या म्यूटेशनने संक्रमित लोकांमध्ये तयार होणाऱ्या न्यूट्रालायजिंग अ‍ॅंटीबॉडीजची क्वालिटी आणि क्वांटिटी प्रभावित होऊ शकत नाही. त्यामुळे या व्हेरिएंटने कुणी संक्रमित झालं तर ही चिंतेची बाब नसेल. तज्ज्ञ सांगतात की, सध्या नव्या व्हेरिएंटने भारताला धोका नाही.

Web Title: Coronavirus : New variant delta plus, All you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.