शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

कोरोनानं होणारा मृत्यूचा धोका कमी करणार डायबिटीसचं 'हे' औषधं; नवीन संशोधनातून खुलासा

By manali.bagul | Updated: January 26, 2021 11:38 IST

CoronaVirus News & Latest Updates : समोर आलेल्या नव्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की,  मेटाफॅर्मिन हे औषध डायबिटीसच्या रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी करू शकते. 

जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं  २१ लाखांपेक्षा अधिक लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. सध्या देशात कोरोनाची लसीकरणाचे अभियान सुरू आहे.  कोरोनामुळे वाढणारा मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका अशा लोकांना  जास्त असतो जे डायबिटीस किंवा अन्य गंभीर आजारांनी ग्रासलेले असतात कारण त्यांची रोगप्रतिकारकशक्ती फारच कमकुवत असते. समोर आलेल्या नव्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की,  मेटाफॅर्मिन हे औषध डायबिटीसच्या रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी करू शकते. 

'फ्रंटियर्स इन एंडोक्रिनोलॉजी' या पत्रकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. या अभ्यासादरम्यान संशोधकांनी मेटाफॉर्मिन हे औषधानं उपचार घेत असलेल्या डायबिटीसनं पिडीत असलेल्या लोकांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. याआधीही चीनच्या वुहानमध्येही डॉक्टरांनी मेटाफॉर्मिन या औषधावर संशोधन केले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डायबिटीसचे रुग्ण जे कोरोनानं संक्रमित होते ते सुद्धा मेटाफॉर्मिन औषध घेत होते.  Corona Vaccine: कोरोना लसीविषयी गैरसमजूत बाळगू नका; अफवांकडे दुर्लक्ष करा, परंतु 'हे' लक्षात ठेवा 

हे औषध घेणाऱ्यांच्या तुलनेत हे औषध न घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका जास्त  होता. संशोधकांनी या संबंधित आकडेवारी समोर ठेवली आहे. त्यानुसार मेटाफॉर्मिन औषध न घेतल्यानं  २२ डायबिटीसच्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. तेव्हा हे औषध फक्त तीन रुग्ण घेत होते. मागच्यावर्षीही जून जुलै महिन्याच्या आसपास अमेरिकेतील मिन्नीसोटा युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी जवळपास  ६ हजार रुग्णांवर मेटाफॉर्मिन औषधाचा प्रयोग केला होता.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेल्या रुग्णांचा मृत्यूचा धोका कमी करता येतो. अरे व्वा! कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखणारा नेजल स्प्रे लवकरच बाजारात येणार, तज्ज्ञांचा दावा

कोणत्या आजाराचं औषध आहे मेटाफॅर्मिन

हे खूप जुनं औषध असून याचा वापर  १९५० च्या दशकापासून केला जात आहे. हे औषध टाईप २ डायबिटीसच्या रुग्णांच्या उपचारांसाठी वापरलं  जातं. इंग्रजी माध्यम द सन नं दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनचे प्रमुख आरोग्य संस्थान नॅशनल हेल्थ सर्विसकडून सुरूवातीपासूनच या औषधाचा वापर केला जात आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या