CoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 12:15 PM2020-04-01T12:15:06+5:302020-04-01T12:17:35+5:30

भारताने साईंलेंट किलर पोलियोच्या आजाराला सुद्धा जवळपास हरवलं होतं.

CoronaVirus : India will control covid 19 like small pox and polio myb | CoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...

CoronaVirus : पोलियोप्रमाणे कोरोनाला सुद्धा नियंत्रणात आणणार भारत, WHO चे मत...

Next

जगभरात कोरोना व्हायरसला थांबवण्यासाठी देशात अनेक पावलं उचलली जात आहेत. मागिल काही वर्षात जेव्हा अशी परिस्थिती आली होती तेव्हा स्मॉल पॉक्स आणि पोलियो लक्षात घेता डब्ल्यूएचओ ने असं मत व्यक्त केलं आहे की भारताकडे कोरोना पसरवण्यापासून रोखण्यासाठी जबरदस्त क्षमता आहे. भारताने साईंलेंट किलर पोलियोच्या आजाराला सुद्धा जवळपास हरवलं होतं. पोलियोचे रुग्ण शोधण्यापासून लसी करण करण्यापर्यंत अनेक अशा आवश्यक असलेल्या गोष्टी भारतासाठी महत्वपूर्ण ठरल्या आहेत. 

भारताने सोशल डिस्टेंसिंग पाळण्याासाठी लॉकडाऊन जाहिर केलं आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाद्वारे असं सांगण्यात आले की कांजण्या आणि पोलियोला थांबवण्यासाठी आपण यशस्वी ठरलो. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसशी सुद्धा आपण सगळे मिळून लढू शकतो. आपल्याला वॅक्सिनची आवश्यकता असेल. त्यासाठी भारत नेहमीतच वेगवेगळे प्रयोग करत राहिल. 

१९७४ मध्ये भारतात  पसरलेल्या  महामारीचे १५ हजारांपेक्षा जास्त लोक शिकार झाले होते. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली होती. सर्वाधिक मृत्यू बिहार, ओडीसा, पश्चिम बंगाल मध्ये झाले होते. २००९ मध्ये पोलियोचं थैमान पसरलं होतं. २७ मार्च २०१४ मध्ये डब्ल्यूएचओने भारतला पोलिओमुक्त देश घोषित केलं. कारण पाच वर्षात पोलिओची कोणतीही घटना समोर आली नव्हती. 

Web Title: CoronaVirus : India will control covid 19 like small pox and polio myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.