काळजी वाढली! फेस शिल्डमुळे कोरोना संसर्गापासून बचाव होत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा

By manali.bagul | Published: September 23, 2020 03:09 PM2020-09-23T15:09:55+5:302020-09-23T15:40:51+5:30

संसर्गाला दूर ठेवण्यासाठी मास्क इतकंच फेस शिल्ड प्रभावी ठरतं असं अनेकांचे मत आहे. मात्र आता फेस शिल्डबाबत एक  चिंताजनक माहिती  समोर आली आहे.

CoronaVirus : Face shields ineffective against covid19 rules worlds fastest supercomputer | काळजी वाढली! फेस शिल्डमुळे कोरोना संसर्गापासून बचाव होत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा

काळजी वाढली! फेस शिल्डमुळे कोरोना संसर्गापासून बचाव होत नाही; सुपर कंप्यूटरचा दावा

Next

कोरोना व्हायरसनं गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे.  जोपर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोरोना ना जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या अनलॉकमध्ये कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरणं, सोशल डिस्टेंसिंग,  सॅनिटायजर, वैयक्तिक स्वच्छता आणि फेस शिल्डच्या वापरावर अधिक भर दिला जात आहे. निरोगी राहण्यासाठी आणि संसर्गाला दूर ठेवण्यासाठी मास्क इतकंच फेस शिल्ड प्रभावी ठरतं असं अनेकांचे मत आहे. मात्र आता फेस शिल्डबाबत एक  चिंताजनक माहिती  समोर आली आहे.

जपानी सुपर कंम्पुटरनुसार, (Japanese Supercomputer Fugaku) कोरोनापासून वाचण्यासाठी लोक प्लास्टिक शिल्डचा चेहऱ्यावर वापर करत आहेत. पण हे फेस शिल्ड्स ऐरोसोल्साला पकडण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचं दिसून आलं आहे. तसंच हे प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित ठेऊ शकत नसल्याचा, दावा सुपर कंम्पूटरकडून करण्यात आला आहे.

जगातील सर्वात फास्ट कंम्पुटर फुगाकूने कोरोनापासून बचावसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक फेस शिल्डचं सिमुलेशन केलं आहे. ज्यात   १०० टक्के एयरबॉर्न ड्रॉपलेट्स ५ मायक्रोमीटरहून लहान आढळले. परिणामी पारदर्शी फेस शिल्डच्या वापरानं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सेंटर फॉर कंम्पुटर सायन्स रिकेनचे प्रमुख  मोटो त्सुबोकोरा  यांनी सांगितलं की, फेस शिल्डला मास्कला पर्याय म्हणून पाहणं चुकीचं ठरेल. मास्कच्या तुलनेत फेस शिल्ड कमी प्रभावी आहे. जपानमधील रिकेन सायंटिफिक रिसर्च कंपनीचा फुगाकू सुपर कंम्पुटर अतिशय वेगवान आहे. जो एका सेकंदात ४१५ क्वाड्रिलियनची गणना करु शकतो.  श्वास घेण्याच्या प्रक्रियेतून वॉटर ड्रॉपलेट्स कसे पसरले जातात याचा देखील याने शोध लावला आहे.  सुपर कंम्पुटर कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचंही काम करत असल्याचं  सांगितलं जात आहे. 

सिरम इन्स्टिट्यूटने बनवली CDX-005 नेझल स्प्रे कोरोना लस

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकेतील कंपनी कोडाजेनिक्ससह लस तयार करण्याचा करार केला होता. ही लस तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही लस नाकाद्वारे दिली जाते. कोडाजेनिक्सकडून एक निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनातून  याबाबत माहिती देण्यात आली आहे. या लसीचे नाव CDX-005 आहे.  या लसीच्या चाचणीसाठी प्राण्यांवर प्री क्लिनिकल ट्रायल पूर्ण केले होते. या वर्षाच्या शेवटापर्यंत UK मध्ये या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात होणार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार प्री क्लिनिकल अभ्यासात या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

कोडाजेनिक्सचे सीईओ जे रॉबर्ट कोलमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''सिरम इंन्स्टिट्यूटची टेक्निक आणि आर्थिक मदत पाहता या वर्षीच्या शेवटापर्यंत लसीच्या वैद्यकिय चाचण्या पूर्ण होतील अशी आशा आम्हाला आहे. तसंच लसीवर वेगानं काम सुरू होऊ शकतं. ही लस तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. व्हायरसचं म्यूटेशन पाहता SARS-CoV-2 जीनोम्सना रिकोड करतो. या लसीमुळे रोगाशी लढण्याची क्षमता नसतानाही शरीरात मजबूत टी सेल्स आणि एंटीबॉडी तयार  करता येतात.''

पुढे त्यांनी सांगितले की, ''इतर लसींपेक्षा ही लस खूपच वेगळी आहे. सध्या जी लस तयार केली जात आहे ती एडीनोव्हायरसवर आधारित आहे. त्यामुळे स्पाईक प्रोटिन्सना टार्गेट करता येऊ शकतं. CDX-005 ही लस इंजेक्शनच्याऐवजी नाकाद्वारे दिली जाणार आहे. ही लस रुग्णांसाठी परिणामकारक आणि सुरक्षित ठरेल.'' सिरम इन्स्टिट्यूटला ही  लस तयार करण्यासाठी भारताच्या (DBT) कडून मंजूरी मिळाली आहे.  याव्यतिरिक्त सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया एक्स्ट्रा जेनेका कंपनीच्या सहयोगाने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कोरोना लसींच्या चाचण्यांवर काम करत आहेत. 

हे पण वाचा-

'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान

दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...

पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय

भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग

तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय

Web Title: CoronaVirus : Face shields ineffective against covid19 rules worlds fastest supercomputer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.