Coronavirus: मोठी बातमी! कोरोना उपचारासाठी आणखी एका औषधाला मान्यता; रुग्णांची ऑक्सिजनची गरज संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 03:43 PM2021-05-08T15:43:06+5:302021-05-08T15:46:25+5:30

DRDO Developed drug2-deoxy-D-glucose (2-DG): या औषधाला आता 2 Deoxy D glucose(2 DG) असं नाव देण्यात आलं आहे. त्याच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेंट्रीजला देण्यात आली आहे.

Coronavirus: DRDO’s anti-Covid drug 2-DG receives DCGI approval for emergency use | Coronavirus: मोठी बातमी! कोरोना उपचारासाठी आणखी एका औषधाला मान्यता; रुग्णांची ऑक्सिजनची गरज संपणार

Coronavirus: मोठी बातमी! कोरोना उपचारासाठी आणखी एका औषधाला मान्यता; रुग्णांची ऑक्सिजनची गरज संपणार

Next
ठळक मुद्देया औषधाचा वापर ज्या रुग्णांवर केला गेला त्यांच्यात वेगाने बरे होण्याचे प्रमाण दिसलेफेज ३ मध्ये डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान देशातील २७ हॉस्पिटलमध्ये चाचणी घेतलीज्या रुग्णांना 2 DG हे औषध दिलं त्यातील ४२ टक्के रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनची गरज तिसऱ्या दिवशी संपली.

नवी दिल्ली – कोरोना संक्रमणाने रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. अशातच शनिवारी एक दिलासादायक बातमी आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(DCGI) ने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आणखी एका औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँन्ड सायन्स(INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूलर एन्ड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्रितपणे तयार केले आहे.

या औषधाला आता 2 Deoxy D glucose(2 DG) असं नाव देण्यात आलं आहे. त्याच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेंट्रीजला देण्यात आली आहे. हे औषध क्लीनिकल चाचणीत यशस्वी ठरलं आहे. दावा आहे की, या औषधाचा वापर ज्या रुग्णांवर केला गेला त्यांच्यात वेगाने बरे होण्याचे प्रमाण दिसले. त्याचसोबत जे रुग्ण ऑक्सिजनवर निर्भर होते ते कमी झाले. या औषधाच्या वापरामुळे रुग्णांचा कोरोना रिपोर्ट इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह आला आहे. म्हणजेच हे रुग्ण लवकर बरे होत आहेत.

डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी एप्रिल २०२० मध्ये लॅबमध्ये या औषधावर प्रयोग केला होता. या प्रयोगात कळालं की, हे औषध कोरोना व्हायरस रोखण्यासाठी मदत करू शकतं. त्याआधारे DCGI ने मे २०२० मध्ये या औषधाच्या फेज २च्या चाचणीसाठी मान्यता दिली.

क्लीनिकल चाचणीत काय आढळलं?

फेज २ मध्ये देशातील हॉस्पिटलमध्ये या औषधाची चाचणी घेण्यात आली. फेज २ ए चाचणीचे ६ आणि फेज २ बी चाचणी ११ हॉस्पिटलमध्ये केली. ११० रुग्णांचा यात समावेश होता. ही ट्रायल मे ते ऑक्टोबर दरम्यान घेतली गेली. त्याचा परिणाम असा झाला की, ज्या रुग्णांना हे औषध दिलं ते इतरांच्या तुलनेत लवकर बरे झाले. चाचणीत सहभागी रुग्ण दुसऱ्या रुग्णांच्या तुलनेत २.५ दिवस आधीच ठणठणीत झाले.

फेज ३ मध्ये डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान देशातील २७ हॉस्पिटलमध्ये चाचणी घेतली. यात २२० रुग्णांचा समावेश होता. ही चाचणी दिल्ली, यूपी, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडूत झाली. ज्या रुग्णांना 2 DG हे औषध दिलं त्यातील ४२ टक्के रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनची गरज तिसऱ्या दिवशी संपली. परंतु औषध न घेतल्याला ३१ टक्के रुग्णांना ऑक्सिजनवर निर्भर राहावं लागत होतं. म्हणजे हे औषध मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता कमी करतं. यात ६५ वर्षावरील वृद्धांमध्येही जे जाणवून आलं.

हे औषधं कसं काम करतं?

हे औषध पावडरच्या स्वरुपात दिलं जातं. जे पाण्यात मिसळून प्यायचं असतं. हे औषधं संक्रमित कोशिकांमध्ये जमा होतं आणि व्हायरल सिंथेसिस आणि एनर्जी निर्माण करणाऱ्या व्हायरसला रोखतं. हे औषध खूप फायदेशीर ठरत आहे. देशात वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशातच या औषधाच्या वापरामुळे रुग्णांना जास्त काळ हॉस्पिटलमध्ये थांबण्याची गरज पडणार नाही असं दावा केला जात आहे.  

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: DRDO’s anti-Covid drug 2-DG receives DCGI approval for emergency use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app