शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

coronavirus: "कोरोना नियंत्रणात येणार, फेब्रुवारीपर्यंत केवळ ४० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरणार"

By बाळकृष्ण परब | Published: October 19, 2020 7:08 PM

corona virus news : गेल्या काही दिवसांपासून देशात नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासिंयांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

ठळक मुद्देपुढच्या तीन-ते चार महिन्यांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणार फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात कोरोनाचे केवळ ४० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरतीलकोरोनाविरोधातील लसीकरण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत राज्य सरकारसोबत योग्य वेळी चर्चा केली जाईल

नवी दिल्ली - मार्च महिन्यापासून देशात धुमाकूळ घालत असलेल्या आणि सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या फैलावाने सर्वांना चिंतेत टाकले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासिंयांना दिलासा देणारे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून केवळ ४० हजार एवढीच राहील, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांच्या मदतीने भविष्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येचे आकलन करणारे मॉडेल तयार केले आहे. शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या संशोधनामधून जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार पुढच्या तीन-ते चार महिन्यांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणार आहे. तसेच फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात कोरोनाचे केवळ ४० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरतील, असा दावा हर्षवर्धन यांनी केला.

कोरोनावरील लसीबाबत हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाविरोधातील लसीकरण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत राज्य सरकारसोबत योग्य वेळी चर्चा केली जाईल. देशात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू द्यायची नाही आहे. तसेच आम्ही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होतानाही बघत आहोत.यापूर्वी नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी थंडीच्या ऋतूमध्ये संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, सुरक्षेबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केल्यास फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईल, असे त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत