खुशखबर! कोरोनाच्या औषधांबाबत अमेरिकेतील कंपनीने केली मोठी घोषणा; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 13:20 IST2020-06-05T13:12:48+5:302020-06-05T13:20:30+5:30
CoronaVirus Latest updates : या औषधामुळे रुग्णालयात भरती होत असलेल्या रुग्णाच्या क्षमतेची, रोगप्रतिकारकशक्तीची माहिती मिळू शकेल

खुशखबर! कोरोनाच्या औषधांबाबत अमेरिकेतील कंपनीने केली मोठी घोषणा; जाणून घ्या
जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यात अनेक देशांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. याच दरम्यान एक चांगली बातमी ऐकायला मिळत आहे. अमेरिकेतील एली लिली एण्ड कंपनी (Eli Lilly and Company) ने एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसमधून बाहेर येत असलेल्या रुग्णाच्या रक्तातील नमुने घेऊन औषधाची चाचणी सुरू करण्यात येणार आहे.
या औषधाचे नाव 'LY-CoV555 आहे. या औषधाला लिली आणि सेल्लेरा बायोलॉजी कंपनीने मिळून तयार केले आहे. या कंपनीने दावा केला आहे की, या औषधामुळे रुग्णालयात भरती होत असलेल्या रुग्णाच्या क्षमतेची, रोगप्रतिकारकशक्तीची माहिती मिळू शकेल. हे औषध तयार होण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. हे असं औषधं आहे. ज्याने कोरोनाचा खात्मा केला जाईल. या औषधाने कोरोनाच्या स्पाईक प्रोटीन्सना नष्ट करता येऊ शकतं.
या औषधाचा वापर केल्याने कोरोना विषाणू शरीरातील निरोगी पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे व्हायरसं संक्रमण झाल्यानंतरही शरीर सामना करू शकतं. हे औषध कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं तसंच लवकरात लवकर उपलब्ध होण्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. या अभ्यासातून असं दिसून आलं की, कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटिन्सवर या ओषधाचा नकारात्मक परिणाम दिसून येतो.
कोरोनाच्या ५ लसींवर अमेरिकेने दाखवला विश्वास; 'या' महिन्यात येऊ शकते कोरोनाची लस
पावसाळ्यात डास चावल्यास ५ गंभीर आजारांना पडू शकता बळी; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय