शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

CoronaVaccine: खूशखबर! आता भारतात येणार 'ही' सिंगल डोस कोरोना लस? इमर्जन्सी वापरासाठी मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 2:24 PM

सध्या भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन, कोविशिल्ड आणि रशियाची स्पुतनिक-व्ही या लसींचा वापर केला जात आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला लवकरच आणखी एक लस मिळू शकते. अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने भारत सरकारकडे आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे, ही सिंगल डोस लस आहे. म्हणजेच, या लसीचा एकच डोस कोरोनाच्या विरोधात पुरेसा आहे. भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या ज्या लसींचा वापर होत आहे, त्या सर्व लसींचा डबल डोस घ्यावा लागतो. (CoronaVaccine johnson brought single dose vaccine sought permission for use against corona virus)

परवानगी मिळाली तर असेल चौथी लस -सध्या भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन, कोविशिल्ड आणि रशियाची स्पुतनिक-व्ही या लसींचा वापर केला जात आहे. या तीन्ही लसींच्या माध्यमाने देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीमही राबवली जात आहे. यातच, भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीलाही परवानगी दिली, तर ती चौथी लस असेल. महत्वाचे म्हणजे, या लसीचा एकच डोस कोरोनाला रोखण्यासाठी पुरेसा आहे. 

CoronaVirus : कोव्हॅक्सीन घेतलेल्यांची विचित्र कोंडी, टेन्शन वाढलं...! ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

जवळपास 50 कोटी लोकांना टोचण्यात आली लस -कोव्हॅक्सीन, कोविशिल्ड आणि स्पुतनिक-व्हीच्या सहाय्याने आतापर्यंत भारतात सुमारे 50 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 49.5 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी देशात 50.29 लोकांना लस टोचण्यात आली आहे. याच बरोबर, 18 ते 44 वयोगटातील 16.92 कोटी लोकांना आतापर्यंत पहिला डोस देण्यात आला आहे. तर 1.07 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

देशात 24 तासांत 44 हजार 643 कोरोनाबाधितांची नोंद -देशभरात गेल्या 24 तासांत 44 हजार 643 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 464 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 4 लाख 14 हजार 159 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 41 हजार 096 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत 3 कोटी 10 लाख 15 हजार 844 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

CoronaVirus : जगातील 135 देशांत डेल्टा व्हेरिएंटचा कहर, WHO नं जारी केली आठवड्याची धडकी भरवणारी आकडेवारी

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 6 हजार 695 नवे कोरोनाबाधित - महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 6 हजार 695 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 17 हजार 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे. राज्यात आज 120 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmericaअमेरिका