शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

भारतात कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांवर; कोरोनापासून बचावासाठी WHO नं सांगितले प्रभावी उपाय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 18:44 IST

CoronaVirus : आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार असून कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही. आशियात रोज कोविड १९ च्या संक्रमणाच्या ५५ हजारांपेक्षा जास्त केसेस समोर येत आहेत.

गेल्या २४ तासात कोरोन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ३४,९५६ नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत.  तर ६८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी दिलेल्या माहितीनुसार आता आधीसारखे सामान्य जीवन जगणं कठीण आहे. आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार असून कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही.  आशियात रोज कोविड १९ च्या संक्रमणाच्या ५५ हजारांपेक्षा जास्त केसेस समोर येत आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे भारताचे आहेत.  जास्त लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना टेस्ट ज्या वेगाने व्हायला हव्यात तश्या आपल्या देशात होताना दिसून येत नाहीत. टेस्टिंगमध्ये भारत ३२ व्या क्रमांकावर आहे.

या गोष्टी लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेले उपाय लक्षात घेणं गरजेचं आहे.  कोरोनापासून बचावासाठी WHO ने मास्कचा आणि सॅनिटायजरचा वापर करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला आहे. देशात नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तरीसुद्धा देशात अनेक ठिकाणी सोशस डिस्टेंसिंगचं पालन केलेलं दिसत नाही. त्यामुळे संक्रमण वाढत आहे. WHO कडून सॅनिटायजचा वापर वारंवार साबणाने हात धुणं आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन हे मुख्य तीन उपाय सांगितले आहेत.  

या आधीसुद्धा जागतिक आरोग्य संघटनेनं एका व्हिडीओच्या माध्यमातून खाद्यपदार्थ व्हायरस आणि बॅक्टेरिया मुक्त कसे ठेवता येतील याबाबत सांगितले होते. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जर कोणत्याही व्यक्तीने दुषित अशा अन्नाचे सेवन केले तर पोटदुखी, अतिसार, अपचन, उलट्या, ताप यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा प्रदुषित अन्नाचे सेवन केल्यामुळे मृत्यूचाही सामना करावा लागतो.पॅथोजेनिक माइक्रोऑर्गेनिजम शरीरात वेगाने वाढून आपली संख्या वाढवतात. त्यामुळे आरोग्यांच्या समस्या जाणवतात. या स्थितीपासून बचाव करण्यासाठी काही गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे

काही खाण्याआधी किंवा अन्नपदार्थांना स्पर्श करण्यासाठी हात स्वच्छ धुवा, 

फ्रिजमध्ये उरलेले अन्न ठेवताना कच्च आणि शिजलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा. त्यामुळे किटाणू निर्माण होणार  नाहीत.

जेवण बनवताना चांगले शिजवून मगच सेवन करा. अर्धवट शिजलेले अन्न शरीरासाठी घातक ठरू शकते.

योग्य तापमानात अन्न साठवून ठेवा. खाद्यपदार्थ विकत घेताना पाकिटावर लिहिलेला मजकून नीट वाचा. 

चांगल्या दर्जाच्या मसाल्यांचा वापर करा. 

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना