शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:50 IST

Corona Virus : भारतात कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट देखील समोर आला असून XFG असं त्याचं नाव आहे.

भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वेगाने वाढत आहेत, गेल्या महिन्यापासून वाढू लागलेल्या रुग्णांची संख्या आता ६४९१ वर पोहोचली आहे. चिंतेची बाब म्हणजे भारतात कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट देखील समोर आला असून XFG असं त्याचं नाव आहे. हा नवीन व्हेरिएंट माणसांच्या सर्वात मजबूत रोगप्रतिकारक शक्तीलाही चकवा देण्यास सक्षम आहे. सध्या या नवीन व्हेरिएंटचे १६३ रुग्ण नोंदवले गेले आहेत.  

देशात २२ मे रोजी फक्त २५७ सक्रिय रुग्ण होते, तर ९ जून रोजी हा आकडा ६४९१ पर्यंत वाढला आहे. गेल्या २४ तासांबद्दल बोलायचं झालं तर देशात ३५८ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, येथेही ६२४ लोक या संसर्गातून बरे झाले आहेत. द लॅन्सेट जर्नलमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे ज्यामध्ये असं दिसून आलं आहे की कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XFG वेगाने पसरतो. 

XFG व्हेरिएंटमध्ये एकूण चार म्यूटेशन 

रिपोर्टनुसार, XFG व्हेरिएंटमध्ये एकूण चार म्यूटेशन आहेत. म्हणूनच तो इतर व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरत आहे. असं सांगितलं जात आहे की या कोरोना व्हेरिएंटचा  पहिला रुग्ण कॅनडामध्ये सापडला होता, परंतु त्याचा संसर्ग इतर देशांमध्ये पसरला आहे आणि आता भारतातही आहे. डॉक्टरांनी मात्र हा नवीन व्हेरिएंट फारसा चिंताजनक नाही, गंभीर लक्षणं दिसत नाहीत असं म्हटलं आहे. 

देशात NB.1.8.1 आणि LF.7 चे रुग्ण 

सध्या देशात NB.1.8.1 आणि LF.7 चे रुग्ण देखील समोर येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने NB.1.8.1 आणि LF.7 दोन्ही व्हेरिएंटला 'निरीक्षणाखालील व्हेरिएंट' म्हणून ठेवलं आहे. याचा अर्थ असा की, सध्या या दोन्ही व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे आणि ते अद्याप जास्त त्रासाचं कारण बनलेलं नाही.

एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे संक्रमित 

द हिंदूमधील एका रिपोर्टनुसार, चीन आणि आशियातील इतर भागांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या वाढीमागे हा व्हेरिएंट असल्याचं मानलं जातं. हे दोन्ही व्हेरिएंट कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये अनेक बदल करतात, ज्यामुळे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे संक्रमित होतं. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतHealthआरोग्य