शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

Corona Vaccine: कोरोना डेल्टा व्हेरिएंटविरोधात लस किती प्रभावी? जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:54 PM

Coronavirus: डेल्टा स्वरुपाचा विचार केला तर तो अशा लोकांना संक्रमित करत आहेत ज्यांनी कोविड १९ लसीचा एक डोस घेतला आहे

ठळक मुद्देअनेक म्यूटेशन झाल्यामुळे लसीचा कोरोना विषाणूविरोधात प्रभाव कमी होऊ शकतो.भारतात सापडलेला डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या म्यूटेशनमुळे तयार झाला आहे. व्हायरसमध्ये बदल झाल्याने तो लोकांमध्ये सहजपणे पसरू शकतो. 

वॉश्गिंटन – जगभरासह भारतात कोरोनच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अलीकडे देशातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. हा व्हायरस वेगाने पसरत गेल्यास देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते अशी भीती तज्त्रांनी व्यक्त केली आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेने कोविड १९ लस ही डेल्टा व्हेरिएंटवर कमी प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे त्यामुळे लसीकरणानंतरही लोकांना कोरोनाची भीती सतावत आहे.

परंतु लसीकरणामुळे मृत्यूचा धोका आणि गंभीर आजारापासून वाचू शकतं असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. WHO महामारी तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, अनेक म्यूटेशन झाल्यामुळे लसीचा कोरोना विषाणूविरोधात प्रभाव कमी होऊ शकतो. भारतात सापडलेला डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या म्यूटेशनमुळे तयार झाला आहे. व्हायरसमध्ये बदल झाल्याने तो लोकांमध्ये सहजपणे पसरू शकतो. 

रशियाचा दावा स्पुतनिक(Sputnik) लस प्रभावी

रशियाने मंगळवारी दावा केलाय की, त्यांची स्पुतनिक व्ही लस ही भारतात सर्वात आधी सापडलेल्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावीशील आहे. कोणत्याही इतर लसींच्या तुलनेत स्पुतनिक लस जास्त संक्रमण आणि धोकादायक व्हेरिएंट्सच्या विरोधात जास्त प्रभावी ठरते. याबाबत गमलेया सेंटर स्टडी रिव्यू जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.

लसीचे दोन्ही डोस गरजेचे

डेल्टा स्वरुपाचा विचार केला तर तो अशा लोकांना संक्रमित करत आहेत ज्यांनी कोविड १९ लसीचा एक डोस घेतला आहे. त्यामुळे त्याचे संक्रमण वाढत आहे. इंग्लंडच्या आरोग्य विभागानुसार, ज्या लोकांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांचा कोरोनातून ८८ टक्के बचाव होत आहे. तर फायझर अथवा एस्ट्राजेनेका लसीचा केवळ एक डोस घेतला आहे. ते फक्त ३३ टक्के वाचू शकतात.

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळले

राज्यात डेल्टा प्लस(Delta Plus Variant) विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे.या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

या संदर्भात अधिक माहिती देतांना राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने  घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना