शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : वॅक्सीन घेतल्यावरही लोकांना कोरोनाची लागण का होत आहे? जाणून घ्या कारण आणि बचावाचे उपाय.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 13:55 IST

Coronavirus : देशात आणि परदेशात अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत ज्यात वॅक्सीन घेतल्यावरही लोकांना कोरोना होत आहे. अशा केसेसची संख्या भलेही कमी आहे. पण धोका असतोच.

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचं थैमान अजूनही देशात सुरू आहे. कोरोना संक्रमणातून बचावासाठी सध्या सर्वात चांगला उपाय वॅक्सीनच (Corona Vaccine) आहे. पण देशात आणि परदेशात अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत ज्यात वॅक्सीन घेतल्यावरही लोकांना कोरोना होत आहे. अशा केसेसची संख्या भलेही कमी आहे. पण धोका असतोच. अशात असं का होत आहे, वॅक्सीन घेतल्यावर लोकांनी काय काळजी घ्यावी यावर एक्सपर्ट्सनी काही सल्ले दिले आहेत.

काय आहे कारण?

जर एखाद्या व्यक्तीने कोरोना वॅक्सीनचा पहिला डोज घेतला असेल, पण नंतर त्याला कोरोनाची लागण झाली असेल. यावर बिडला हॉस्पिटलचे डॉ. राजा धार यांनी सांगितले की, वॅक्सीन एक बूस्टर म्हणून काम करते. ज्याने तुमचा ताप आणि इतर प्रकारच्या लक्षणांपासून बचाव होण्यास मदत मिळते. याने तुमची मदत होते, पण तुम्ही वॅक्सीन घेतल्यावरही काळजी घेण्याची गरज आहे. (हे पण वाचा : Mucormycosis : 'असा' मास्क वापरत असाल तर तुम्हालाही होऊ शकतो ब्लॅक फंगस; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा)

एक्सपर्ट काय सांगतात?

दुसरे एक्सपर्ट मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. अविरल रॉय यांच्यानुसार, वॅक्सीन तुमच्या शरीराला काही प्रमाणात ताकद देते.  पण पुन्हा संक्रमण होण्यामागे एक कारण आहे. व्हायरस हा नाकातून आपल्या शरीरात प्रवेश करतो. पण आता जी वक्सीन मिळत आहे ती नाकात नाही तर रक्तात अॅंटीबॉडी तयार करत आहे. अशात व्हायरसचा येण्याचा मार्ग उघडाच आहे. मात्र, वॅक्सीन घेतली तर इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो.

लोकांच्या मनात असाही प्रश्न आहे की, वॅक्सीन अखेर किती मदत करत आहे. काही एक्सपर्ट सांगतात की, वॅक्सीनचा एक डोज दोन आठवड्यांनंतर प्रभाव दाखवतो आणि कोणत्याही व्यक्तीला ५०-५० टक्के सुरक्षा मिळते. तर काही एक्सपर्ट ही सुरक्षा ८५ टक्के मिळत असल्याचं सांगतात. तेच दुसरा डोज घेतल्यावर कोरोनापासून सुरक्षा ९५ टक्के मिळते असं सांगितलं जातं. (हे पण वाचा : कोविड संक्रमणापासून बचावासाठी फायदेशीर ठरतात ३ व्यायाम प्रकार; लवकर रिकव्हर होण्याचा सोपा उपाय)

आता जेव्हा काही लोकांना वॅक्सीन घेतल्यावरही कोरोना होत आहे. तर लोकांच्या मनात वॅक्सीनबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पण मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अविरल रॉय म्हणाले की, वॅक्सीन घेण्यासाठी काही विचार करण्याची गरज नाही. तुमचा नंबर येत असेल तर नक्की घ्या. वॅक्सीनने तुमचं काही वाईट होत नाही. उलट वॅक्सीन घेतल्यावर तुम्हाला कोरोना झाला तरी त्याच्यासोबत लढण्याची तुम्हाला ताकद मिळेल. कोरोनाचा प्रभाव कमी होईल.

तेच डॉ.धर म्हणाले की, वॅक्सीनचा पहिला डोज घेतल्याने सुरक्षा मिळते ती काही प्रमाणात कमी असते. पण लोकांना वाटतं की, आता वॅक्सीन घेतली तर काहीच समस्या होणार नाही. अशात लोक बेजबाबदारपणे वागू लागतात.

वॅक्सीनेशन नंतर काय करावं?

लोक आता वॅक्सीन घेत आहेत. पण त्यानंतर एक सर्वात मोठी चूक बघायला मिळत आहे. ती म्हणजे मास्क योग्यप्रकारे वापर न दिसणे. वॅक्सीनला अॅंटीबॉडी बनवायला दोन आठवड्यांचा वेळ लागतो. अशात लोकांनी सर्व गाइडलाईनचं पालन केलं पाहिजे. कोरोना हा नाकातूनच शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे एक्सपर्ट हेच सांगतात की तुम्ही मास्क लावूनच ठेवावा. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य