Mucormycosis : 'असा' मास्क वापरत असाल तर तुम्हालाही होऊ शकतो ब्लॅक फंगस; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:09 PM2021-05-12T12:09:31+5:302021-05-12T12:26:56+5:30

Mucormycosis The Black Fungus : गेल्या काही दिवसात ५ ते ६ अशा केसेस पाहायला मिळाल्या आहेत.  याशिवाय जे रुग्ण साफसफाई ठेवत नाहीत. घाणेरडा, ओला मास्क वापरतात त्यांना या आजाराचा धोका जास्त असतो.

Mucormycosis : Wearing dirty and wet mask may cause black fungus in corona | Mucormycosis : 'असा' मास्क वापरत असाल तर तुम्हालाही होऊ शकतो ब्लॅक फंगस; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

Mucormycosis : 'असा' मास्क वापरत असाल तर तुम्हालाही होऊ शकतो ब्लॅक फंगस; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

Next

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ब्लॅक फंगसची जास्त प्रकरणं नव्हती. तर दुसर्‍या लाटेत, गेल्या काही दिवसांत अचानक या घटना समोर आल्या आहेत. कोरोना रुग्ण आधीच लक्षणांमुळे त्रस्त आहे, अशा परिस्थितीत ब्लॅक फंगसचा त्रास झाल्यास रुग्णाच्या समस्या आणखी वाढतात. ब्लॅक फंगसचे अनेक प्रकार असू शकतात. तसंच ब्लॅक फंगसची काही कारणंही आहेत. चेस्ट स्पेशलिस्ट डॉ दिलीप सिंह चावडा यांनी अमर उजाालाशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

डायबिटीसच्या रुग्णांना धोका जास्त

ब्लॅक फंगसचा धोका डायबिटीसच्या रुग्णांना अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता असते. डॉ. चावडा सांगतात की,  ''गेल्या काही दिवसात ५ ते ६ अशा केसेस पाहायला मिळाल्या आहेत.  याशिवाय जे रुग्ण साफसफाई ठेवत नाहीत. घाणेरडा, ओला मास्क वापरतात त्यांना या आजाराचा धोका जास्त असतो. कोरोनासह ब्लॅक फंगस झाल्यामुळे रुग्णाच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते.  त्यामुळे आजारांशी लढण्यात अडथळा येऊ शकतो. ''

एंटी फंगलनं उपचार करता येऊ शकतात ?

ब्लॅक फंगसचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला डोळ्यांमध्ये जळजळ होणं, डोळे बाहेरच्या बाजूला  निघालेले दिसणं, दृष्टी कमी होणं अशी लक्षणं दिसून येतात. अनेकदा रुग्णालाच कळत नाही की त्याला नेमकं काय होत आहे. ब्लॅक फंगसचे उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडून एंपो- टिसिन बी आणि अन्य एंटी फंगल दिले  जातात. या आजाराचे उपचार पूर्ण होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपचार करायला हवेत. 

कोरोना रुग्णांनी या गोष्टींची काळजी घ्या

डॉ. चावडांनी सांगितले की,  ''कोरोना रुग्णांनी काही गोष्टींची काळजी घेतली तर ब्लॅक फंगसच्या आजारापासून लांब राहता येऊ शकतो.  त्यासाठी नेहमीच नाक आणि घसा स्वच्छ ठेवा. घाणेरड्या कापडाचा किंवा ओला रुमाल, मास्क अजिबात वापरू नका,  मास्कला धुवून उन्हात सुकवून मगच वापरा. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला आयसोलेट केलं आहे. ती जागा स्वच्छ असायला हवी.'' 

जर तुम्हाला कोरोना उपचारात स्टिरॉइड्स दिले जात असतील तर हे लक्षात ठेवणे अधिक महत्वाचे आहे की निरोगी होण्यासाठी स्टिरॉइड्स घेत असलेल्या  रूग्णांमध्ये ब्लॅक फंगसची शक्यता वाढत आहे. डॉक्टरांकडून याची काळजी घेतली जात आहे. तरीसुद्धा तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी याबाबत अधिक सावध राहायला हवं. अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

दीर्घकाळ सुरू राहू शकतात उपचार

कोरोनाकाळात तुम्हाला ब्लॅक फंगसचा धोका उद्भवत असेल तर उपचार जास्तीत जास्त काळ चालू शकतात. एंटी बायोटिक्स वाढवावे लागू शकतात. कमीत कमी ४ आठवडे रुग्णाला एंटी फंगल औषध सुरू असतात.  त्यानंतरही बराचवेळ हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी लागतो. वयस्कर लोकांना या आजाराचा धोका जास्त असू शकतो, म्हणून विशेष खबरदारी घ्यायला  हवी. कोरोनाचा भयावह वेग! मृतांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला; गेल्या 24 तासांत 4205 जणांनी जीव गमावला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mucormycosis : Wearing dirty and wet mask may cause black fungus in corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app