सावधान! शौचालयाच्या माध्यमातून 'असा' होतोय कोरोनाचा प्रसार; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा

By Manali.bagul | Published: September 20, 2020 11:03 AM2020-09-20T11:03:44+5:302020-09-20T11:21:01+5:30

CoronaVirus News & Latest Updates : सीडीसीनं चीनच्या एका कोविड सेंटरमध्ये हे संशोधन केलं  होतं. या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस फ्लश, गटार, पाईप्स या माध्यामातून ड्रॉपलेट्सच्या स्वरुपात वातावरणात अस्तित्वात असतो.

Corona may spread by toilet pipe too need to be extra careful while using toilet | सावधान! शौचालयाच्या माध्यमातून 'असा' होतोय कोरोनाचा प्रसार; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा

सावधान! शौचालयाच्या माध्यमातून 'असा' होतोय कोरोनाचा प्रसार; संशोधनातून तज्ज्ञांचा खुलासा

googlenewsNext

(Image Credit- The week)

अमेरिकेच्या तज्ज्ञांनी  काही महिन्यांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार कोरोना  व्हायरसचं संक्रमण माणसांच्या मलाद्वारेही परण्याचा धोका असतो. असा दावा अमेरिकन तज्ज्ञांकडून करण्यात आला होता. कारण अमेरिकेत कोविड १९ च्या  रुग्णाच्या मुत्रात कोरोना व्हायरसचे आरएनए दिसून आले होते. अमेरिकेतील तज्ज्ञांनी चीनी वैज्ञांनिकांकडून केलेल्या संशोधनातून मानवाच्या मलाद्वारे कोरोनाचं संक्रमण पसरू शकतं ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर शौचालयातील पाईपच्या माध्यमातूनही कोरोना संक्रमण पसरण्याचा धोका वाढतो असा दावा अमेरिकन तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. 

आरएनए म्हणजे काय

कोणत्याही व्हायरसची एक स्वतःची संरचना असते. ही संरचना अनुवांशिक असते. व्हायरस कशापासून तयार झाला, म्यूटेशन, बदल यांबाबत आरएनएद्वारे माहिती मिळवता येते. कोणतीही व्यक्ती व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर शरीराच्या काही भागांवर व्हायरस अनेक तासांपर्यंत जीवंत राहू शकतो.  स्वच्छतेचा अभाव आणि तोंडाला सतत स्पर्श करणं यामुळे व्हायरस नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो. अशा स्थितीत संक्रमित व्यक्तीची उलटी आणि मलाद्वारे व्हायरसचे कण बाहेर पडण्याचा धोका असतो. यादरम्यान अन्य निरोगी व्यक्ती व्हायरसच्या संपर्कात आल्यास संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शौचालयाच्या माध्यमातून असा होतो प्रसार

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मल विसर्जनानंतर व्हायरस पाईपलाईनपर्यंत पोहोचून अनेक दिवसांपर्यंत जीवंत राहू शकतो. संक्रमित व्यक्तीने उघड्यावर शौच केल्यास मल सुकल्यानंतरही व्हायरस इतर निरोगी व्यक्तींच्या  संक्रमणाचं  कारण ठरू शकतो. शौचालयाचा वापर करताना फ्लश केल्यानंतर हवेच्या दबावामुळे फ्लशमधून बाहेर येत असलेलं पाणी साचतं. तज्ज्ञांच्यामते पाण्याचे क्लाऊड्स तयार होतात. २ सेकंदात ६  फुटांपर्यंत हे क्लाउड्सवर जाऊ शकतात. यावेळी व्हायरसच्या ड्रॉपलेट्सचा हवेशी संपर्क येतो. सावधगिरी  न बाळगल्यास व्हायरसचं संक्रमण होण्याची शक्यता असते. 

कोरोना व्हायरसचे ड्रॉपलेट्स कोणत्या दिशेने जातात यासाठी रिसर्च करण्यात आला होता. सीडीसीनं चीनच्या एका कोविड सेंटरमध्ये हे संशोधन केलं  होतं. या संशोधनात रिकाम्या अपार्टमेंटच्या स्वच्छतागृहांमध्येही व्हायरसचे ड्रॉपलेट्स दिसून आले.  ही शौचालयं अनेक महिन्यांपासून बंद असतानाही व्हायरसचा प्रवेश त्याठिकाणी झाला होता. या संशोधनातून दिसून आलं की, या अपार्टमेंटच्या खालच्या अपार्टमेंटमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वावर होता. 

या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस फ्लश, गटार, पाईप्स या माध्यामातून ड्रॉपलेट्सच्या स्वरुपात वातावरणात अस्तित्वात असतो. एयरोसोल्स म्हणजेच एअरबॉर्न पार्टीकल्स हवेच्या माध्यमातून एका ठिकाणाहून इतर ठिकाणी जातात. त्यासाठी आजूबाजूच्या अपार्टमेंटमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

आयोडीनमुळे फक्त 15 सेकंदात कोरोना होणार नष्ट?; रिसर्चमधून 'मोठा' खुलासा

आयोडीनमुळे 15 सेकंदात कोरोनाचा नष्ट होणार असल्याचा मोठा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, आयोडीनने (Iodine) नाक आणि तोंड धुतल्यास कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. मात्र याआधी करण्यात आलेल्या काही रिसर्चमध्ये आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संदर्भातील हा दावा फेटाळून लावला आहे. 

लोकांनी आयोडीनने नाक धुतल्यास कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता कमी होत असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. तसेच संशोधकांनी प्रयोगशाळेत कोरोना व्हायरसच्या एक नमुन्यावर तीन वेगवेगळ्या सांद्रतेचे अँटीसेप्टिक पोविडोन-आयोडीन (पीवीपी- I)चे सोल्यूशन टाकले. पोव्हिडोन-आयोडीन 0.5 टक्के सांद्रतेच्या सोल्यूशनमध्ये कोरोना व्हायरस निष्क्रिय करण्यासाठी फक्त 15 सेकंदाचा कालावधी लागला. त्यानंतर संशोधकांकडून नाक आणि तोंड आयोडीनने धुतलं तर कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस हा नाकाच्या रिसेप्टर एसीई -2 वापर करून माणसांच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्यांना कोरोनाची लागण होते. त्यामुळे काही मानवी चाचण्यांमध्ये व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी नाकाची स्वच्छता करून व्हायरसला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आयोडीन प्रभावी असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. एका रिसर्चमधून हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा-

तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय

भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा

आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध

 

Web Title: Corona may spread by toilet pipe too need to be extra careful while using toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.