खायच्या तेलामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका? अमेरिकन रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 12:54 IST2024-12-13T12:50:01+5:302024-12-13T12:54:36+5:30

तुम्हाला हे माहीत आहे का की, कुकींग ऑइल म्हणजेच खायच्या तेलाने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. अमेरिकन सरकारद्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आलाय.

Cooking seeds oil can cause cancer claims American research | खायच्या तेलामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका? अमेरिकन रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

खायच्या तेलामुळे वाढतोय कॅन्सरचा धोका? अमेरिकन रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. या तेलाला खायचं तेल म्हटलं जातं. हे तेल वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे पदार्थांच्या हिशेबाने वापरले जातात. खाण्याच्या तेलाचा मुख्य उद्देश पदार्थ तळून, भाजून त्यांना मुलायम करणं असतं. 

मात्र, तुम्हाला हे माहीत आहे का की, कुकींग ऑइल म्हणजेच खायच्या तेलाने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. अमेरिकन सरकारद्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, खायच्या तेलामुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. हा धोका खासकरून तरूणांमध्ये असतो. हा रिसर्च मेडिकल जर्नल गटमध्ये प्रकाशित झाला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, सूर्यफूल, द्राक्ष्याच्या बीया, कॅनोला आणि मक्याच्या दाण्यांपासून तयार तेलाच्या सेवनाने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. 

कोलन कॅन्सरने पीडित ८० रूग्णांवर जेव्हा रिसर्च करण्यात आला तेव्हा आढळलं की, त्यांच्यात बायोअॅक्टिव लिपिड लेव्हल वाढलेली होती. जी बियांच्या तेलाचं ब्रेकडाउन केल्यानंतर तयार होतं. या रिसर्चमध्ये ३० ते ८५ वयोगटातील लोकांच्या ८१ ट्यूमर नमून्यांचं अवलोकन केलं गेलं आणि त्यांच्या कॅन्सरग्रस्त ट्यूमरमध्ये लिपिड वाढण्याचं कारण सीड्स ऑइल म्हणजे बियांपासून तेल मानलं गेलं. 

सीड्स ऑइल आणि कॅन्सरचा संबंध

आधीच्या रिसर्चमध्ये आरोग्यावर सीड्स ऑइलच्या होणाऱ्या नुकसानकारक प्रभावाची माहिती मिळवण्यात आली होती. याने शरीरात सूज येते. सीड्स ऑइल ब्रेक डाऊन करणारे बायोअ‍ॅक्टिव लिपिड कोलन कॅन्सरला वेगाने विकसित करण्यास मदत करतात आणि शरीराला ट्यूमरसोबत लढण्यापासूनही रोखू शकतात. सीड्स ऑइलमध्ये ओमेगा- ६ आणि पॉलीअनसॅच्युरेडेट फॅटी अ‍ॅसिड असतं. रिसर्चनुसार, सीड्स ऑइलच्या अत्याधिक सेवनाने होणारी सूज कॅन्सरच्या विकासाला मदत करते.

Web Title: Cooking seeds oil can cause cancer claims American research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.