CoronaVirus News: कोरोना रुग्णापासून संसर्ग होण्याची शक्यता कोणत्या ठिकाणी किती?; जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:12 AM2020-06-15T04:12:02+5:302020-06-15T07:03:18+5:30

संसर्ग होण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीसोबत फक्त संपर्कच नव्हे तर संपर्काची वेळ आणि व्यक्तीपासून अंतर, हे संसर्गाची शक्यता ठरवणारे महत्त्वाचे घटक आहेत.

Contact time and distance from corona patient important for infection | CoronaVirus News: कोरोना रुग्णापासून संसर्ग होण्याची शक्यता कोणत्या ठिकाणी किती?; जाणून घ्या संपूर्ण माहिती

CoronaVirus News: कोरोना रुग्णापासून संसर्ग होण्याची शक्यता कोणत्या ठिकाणी किती?; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Next

- अमोल अन्नदाते, (लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

संसर्ग होण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीसोबत फक्त संपर्कच नव्हे तर संपर्काची वेळ आणि व्यक्तीपासून अंतर, हे संसर्गाची शक्यता ठरवणारे महत्त्वाचे घटक आहेत. याविषयी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे भूतपूर्व प्रती कुलगुरू व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. शेखर राजदेरकर सांगतात की, जर कोरोना रुग्णाशी मास्क न घालता तुमचा अर्धा तास बोलण्यासारख्या स्वरूपात जवळचा संपर्क आला तर संसर्ग होईल; पण ही संपर्काची वेळ २५ मिनिटे झाली तर संसर्गाची शक्यता ९०% इतकी कमी होईल. जर हीच संपर्काची वेळ १५ मिनिटे इतकी कमी झाली तर मात्र संसर्ग झाला तरी तो लक्षणविरहित किंवा अत्यंत सौम्य लक्षणे असलेला असेल. जर संपर्काचा हाच कालावधी गृहीत धरून यात नाक व तोंड पूर्ण झाकणारा मास्क, ६ फुटांपेक्षा जास्त शारीरिक अंतर आणि संपर्कानंतर हात धुणे या प्रतिबंधक उपायांची भर पडली तर संसर्गाची शक्यता खूपच कमी होते. म्हणजेच कोरोना संसर्गित रुग्णाचा १५ मिनिटांपेक्षा कमी संपर्क आणि हे प्रतिबंधक उपाय कोरोना टाळण्यासाठी प्रभावी अस्त्र ठरू शकते. कमी संपर्काच्या वेळेने झालेल्या संसर्गातून रुग्ण गंभीर होण्याची शक्यता कमी असेल.
वेळेसोबतच पुढील काही गोष्टी संसर्गाची शक्यता ठरवतील :
बंद जागेत / खुल्या जागेत
छोट्या जागा / मोठी जागा
कमी जागेत जास्त लोक / कमी लोक
वरील गोष्टी गृहीत धरल्यास पुढील गोष्टींमध्ये संसर्गाची शक्यता जास्त की कमी हे सांगता येईल.

कोरोनाबाधित व्यक्तीशी मास्क वापरून व ६ फूटपेक्षा जास्त अंतर राखून समोरासमोर बोलल्यास- संपर्क वेळ ५ मिनिटांपेक्षा कमी असल्यास : संसर्गाची शक्यता खूप कमी
चालताना / जॉगिंग / सायकलिंग करताना दोघांनीही मास्क घातला असल्यास : संसर्गाची शक्यता नाही
हवेशीर व मोकळ्या जागेत संपर्क आल्यास व ६ फूट अंतर राखल्यास : संसर्गाची शक्यता कमी
किराणा दुकान व इतर दुकाने शक्यता-छोट्या जागेत जास्त लोक : संसर्गाची शक्यता जास्त
सार्वजनिक शौचालय / बाथरूम : संसर्गाची शक्यता जास्त
कमाच्या बंदिस्त जागा / शाळा : संसर्गाची शक्यता जास्त
लग्नसमारंभ / इतर अनेक लोक जमतील असे सार्वजनिक समारंभ : संसर्गाची शक्यता जास्त
धार्मिक स्थळे : संसर्गाची शक्यता जास्त
सिनेमागृहे / नाट्यगृहे / शॉपिंग मॉल : संसर्गाची शक्यता जास्त

Web Title: Contact time and distance from corona patient important for infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.