शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

संशोधकांचा दावा: रंगीत फळे आणि भाज्यांच्या सेवनाने गंभीर आजारांचा धोका कमी होतो ३० टक्क्यांपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:12 IST

हॉर्वर्ड टीएचचान पब्लिक हेल्थ स्कूलच्या मते, लहानपणापासून भरपूर फ्लेवोनॉयड असलेला आहार मेंदूसाठी महत्त्वाचा आहे. इतकेच नाही तर यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक होण्याचा धोकाही ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो.

रंगीत फळ आणि भाज्यांचे सेवन करणे मेंदूसाठी फायद्याचे ठरू शकते. फळ, भाज्यांना चमकदार रंग देणारे केमिकल-फ्लेवनॉइड्स विसराळूपणा रोखू शकतात. वाढत्या वयाच्या लोकांमधील गोंधळाची स्थिती दूर करण्यात यांची महत्त्वाची भूमिका आहे. जवळपास एक लाख लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनात फ्लेवनॉयडशी संबंधित आहार, शारीरिक हालचाली, दारूचे सेवन, वय आणि वजनावर लक्ष ठेवण्यात आले. हे घटक म्हातारपणातील विसराळूपणाच्या (डिमेन्शिया) धोक्याशी संबंधित आहेत. न्यूराॅलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनात शास्त्रज्ञांनी सामान्यत: सेवन केल्या जाणाऱ्या २४ प्रकारच्या फ्लेवनॉइड्सच्या आधारे निष्कर्ष काढला आहे. गाजरात कॅरोटीन, स्ट्राॅबेरीत फ्लेवोन, सफरचंदात अँथोसियानिन आढळते. हॉर्वर्ड टीएचचान पब्लिक हेल्थ स्कूलच्या मते, लहानपणापासून भरपूर फ्लेवोनॉयड असलेला आहार मेंदूसाठी महत्त्वाचा आहे. इतकेच नाही तर यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक होण्याचा धोकाही ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो.

हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका कमी होतोहाॅर्वर्ड टीएचचान स्कूलच्या मते, जे लोक दिवसातून जवळपास ८ सर्व्हिंग म्हणजेच ८००-९०० ग्रॅम फळे आणि भाज्यांचे सेवन करतात त्यांच्यात कमी फळे आणि भाज्या (सुमारे १७० ग्रॅम) खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकचा धोका जवळपास ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो.

अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर रिसर्चच्या मते, ब्रोकोली, कोबी, लसूण, कांदा, सलाड पत्ता (लेट्यूस) आणि इतर भरपूर स्टार्च असलेल्या पालेभाज्यांच्या सेवनामुळे तोंड, घसा, पोट आणि स्तन कर्करोगासारख्या अनेक गंभीर कॅन्सर रोगांपासून बचाव करण्यामध्ये मदत मिळते.

मेंदु तल्लख होतोसफरचंद, गाजर, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, सीताफळ आणि पालक, कांदा, पत्ता कोबी, गदड रंगाच्या भोपळ्यासह अनेक फळांमध्ये फ्लेवनॉइड्स आढळतात. पत्ता कोबी, स्ट्रॉबेरी, रंगीन भोपळा आणि कच्च्या पालकाच्या अधिक सेवनाने मेंदू अधिक तल्लख होतो. कांदा, द्राक्षे आणि सफरचंदही फायद्याचे आहे.

पचनक्रिया मजबूत होतेनिरोगी शरीरासाठी पचनक्रिया चांगली असणे खूप गरजेचे आहे. तसेच चांगले पचन होण्यासाठी आहारात फायबर खूप महत्त्वाचे आहे. पालक, कोबी आदी हिरव्या भाज्यांत मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. याशिवाय यामध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए देखील असते. जॉन हॉपकिन्स मेडिसिन इन्स्टिट्यूटच्या मते, पालेभाज्यांत आढळणारी विशेष प्रकारची साखर आतड्यांमध्ये आढळणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढवते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोगHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग