शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माठातले गारेगार पाणी...उजळते काया अन् ठेवी आजार दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 17:36 IST

उन्हाळ्यात फ्रीज मधील पाणी पिण्याचा मोह टाळा. त्याऐवजी माठातलं गारेगार पाणी प्या. बघा आरोग्यात कसा चटकन फरक पडतो.

उन्हाळा म्हटला की थंड पाणी सतत प्यावेसे वाटते. काहीजण अशावेळी फ्रीजमध्ये थंड केलेले पाणी सतत पितात. पण यामुळे आपण सर्दी, खोकला, ताप या आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे या काळात माठातील पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देतात. माठातील पाणी पिण्याचे इतरही काही फायदे आहेत.

पचनक्रिया सुधारतेप्लास्टिकच्या भांड्यात पाणी साठवणे अत्यंत अयोग्य आहे. प्लास्टिकमध्ये बीपीएसारखी हानिकारक रसायने असतात.  माठ हा मातीपासून बनवला जातो. त्यात कोणतेही रासायनिक घटक नसतात त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यात माठातील पाणी महत्वाची भूमिका बजावते. याशिवाय अनेक गंभीर आजाराही दूर राहतात. 

घश्याशी संबधित आजारांना दूर ठेवतेवर नमुद केल्याप्रमाणे फ्रीजमधील पाणी प्यायल्याने घशाशी संबधित आजार होतात. पण माठातील पाणी प्यायलाने उलट हे आजार दूर राहतात. फ्रिजमधील थंड पाणी घशातील पेशींचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरते. माठातील पाणी प्यायल्यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही.

त्वचा चमकदार होतेसकाळी उठल्यावर काहीही न खाता सर्वात आधी माठातील पाणी प्या. यामुळे तुमचं रक्तशुद्धीकरण होईलच पण तुमचा चेहरा तजेलदार राहिल. असे रोज केल्याने तुमचा चेहरा चमकदार दिसू लागेल.

पित्तनाशकमाठातील पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील पीएच संतुलित राहते. त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

उष्माघात रोखतेउन्हाळ्यात उष्माघात रोखण्यासाठी माठातील पाणी निश्चित प्यावे. तसेच त्या्मुळे शरीरात ग्लूकोजची पातळी वाढण्यास मदत होते. माठातील पाण्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे शरीर थंड तर राहतेच पण आरोग्यावरही त्याचा उत्तम परिणाम होतो. 

रोगप्रतिकारशक्ती वाढतेमाठातील पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यासही मदत होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWaterपाणी