शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

तुम्हालाही कोल्ड सोर झालं आहे का? 'या' गोष्टी करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 14:51 IST

थंडीमध्ये कोल्ड सोर (Cold Sore) होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल की, हे नवीन काय? तर, कोल्ड सोर म्हणजे, तोंडामध्ये, ओठांवर किंवा ओठांच्या आजूबाजूला होणारे अल्सर.

थंडीमध्ये कोल्ड सोर (Cold Sore) होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल की, हे नवीन काय? तर, कोल्ड सोर म्हणजे, तोंडामध्ये, ओठांवर किंवा ओठांच्या आजूबाजूला होणारे अल्सर. हे अल्सर झाल्यामुळे अनेकदा अत्यंत वेदनांचा सामान करावा लागतो. तसेच हे अल्सर अनेकदा जखमेच्या स्वरूपात असतात किंवा मग पूरळांसारखे असतात. आता तुम्ही म्हणाल की, हे आम्हालाही बऱ्याचदा होतात, पण नेमकं कारण हे होण्यामागे कारण काय? गोंधळून जाऊ नका. आम्ही तुम्हाला कारणही सांगणार आहोत. खरं तर हे कोल्ड सोर हर्पीस सिंप्लेक्स व्हायरस (herpes simplex virus) HPV मुळे होतात. याला फिवर ब्लिस्‍टर्स किंवा हरपीज सिम्‍प्‍लेक्‍स असंही म्हटलं जातं. एकदा या व्हायरसने शरीरामध्ये प्रवेश केला, की हा काही लगेच आपला पिछा सोडत नाही. हा व्हायरस आपल्या नर्व सेल्समध्ये असतो. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, याची लक्षणं सहज कोणाला समजत नाहीत. पण या अत्यंत वेदनादायी अशा कोल्ड सोरपासून सुटका करून घेण्यासाठी काही घरगुती उपाय मदत करतात. जाणून घेऊया या उपायांबाबत...

कोल्ड सोरपासून सुटका करण्यासाठी काही घरगुती उपाय :

1. लसूण 

लसणामध्ये मायक्रोबियल गुणधर्म आहेत आणि हे सूज कमी करण्यासाठी मदत करतात. तुम्ही कोल्ड सोरवर लसूण लावू शकता. पण लक्षात ठेवा, तेव्हाच लसणाचा उपयोग करा जेव्हा तुम्हाला कोल्ड सोर किंवा पूरळ येणार असल्याचे जाणवेल. कारण कोल्ड सोर होण्याआधी त्या जागेवर थोडी थोडी जळजळ आणि वेदना होण्यास सुरुवात होते. 

(Image Creadit : SmartGirls.in)

2. पेपरमिंट आणि टी ट्री ऑइल 

पेपरमिंट आणि टी ट्री ऑइलमध्ये अ‍ॅन्टी-बॅक्टेरिअल तसेच अ‍ॅन्टी-सेप्टिक गुणधर्म होते. काही संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, कोल्ड सोरला सुरुवात होण्याच्या आधी याचा वापर केल्याने अल्सर होण्याआधीच रोखता येऊ शकतात. खोबऱ्याचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल सोबत पेपरमिंट आणि टी ट्री ऑइलचे काही थेंब एकत्र करून कॉटन बॉलच्या मदतीने कोल्ड सोरच्या ठिकाणी लावू शकता. 

3. विटामिन सी

आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि आजारांपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक असतं. त्यासाठी व्हिटॅमिन-सी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट आणि इम्युनिटी बूस्टर असतात. त्यामुळे आहारामध्ये व्हिटॅमिन-सीचा समावेश केल्याने फायदा होतो. 

(Image Creadit : Dr. Weil)

4. लेमन बाम

लेमन बाम कोल्ड सोरमुळे होणाऱ्या पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात. यामध्ये हर्बल घटकांचा समावेश होतो. त्यामुळे कोल्ड सोरमुळे झालेले अल्सर दूर करण्यासाठी हे मदत करतात. नियमितपणे याचा वापर केल्याने फायदा होतो. 

5. मध

कोल्ड सोरमुळे प्रभावित झालेल्या भागांवर 5 ते 7 मिनिटांसाठी मध लावल्याने फायदा होतो. दिवसातून दोन वेळा असं केल्याने आराम मिळेल. मधामध्ये असलेले अ‍ॅन्टीमायक्रोबियल गुणधर्म कोल्ड सोरमुळे येणारी सूज आणि खाज कमी करण्यासाठी मदत करतात. 

6. आलं

आल्याचे तुकड्याने कोल्ड सोरवर मसाज केल्याने आराम मिळतो. तसेच रिकाम्या पोटी आलं खाल्यानेही फायदा होतो. आल्यामध्ये अ‍ॅन्टीसेप्टिक आणि हिलिंग इफेक्ट असतात. जे व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढण्यासाठी मदत करतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स