शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हार्ट स्ट्रोक आणि टाइप-२ डायबिटीसचा धोका कमी करते कॉफी - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 10:05 IST

अनेक रिसर्चमधून याआधीही हे सिद्ध झालं आहे की, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं.

(Image Credit : businessinsider.com)

अनेक रिसर्चमधून याआधीही हे सिद्ध झालं आहे की, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं. अनेकजण टेस्ट बदलण्यासाठी आणि डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी कॉफीचं सेवन केलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, जगभरात कॉफी पिण्याचं वाढतं प्रमाण पाहता याने मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या होऊ शकते? नुकत्याच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कॉफीचं सेवन केल्याने कार्डिओवस्कुलर म्हणजे हार्ट स्ट्रोक होण्याचा धोका कमी असतो. 

हृदयासाठी फायदेशीर कॉफी

(Image Credit : multibriefs.com)

अभ्यासकांना आपल्या रिसर्चमध्ये असं आढळलं की, कॉफी सेवन केल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी होतो आणि याच सिंड्रोममुळे आपल्या शरीरात कार्डिओवस्कुलर डिजीजचा धोका वाढतो. Metabolic Syndrome (Mets) हा हार्ट डिजीज जसे की, हार्ट स्ट्रोकसाठी जबाबदार असतो. यूनिव्हर्सिटी ऑफ कॅटेनिया, इटलीच्या अभ्यासकांना असं रिसर्चमध्ये आढळून आलं. कॅटेनिया विश्वविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक गिउसेप ग्रोसो यांनी कॉफीचं सेवन आणि मेटाबॉलिक सिंड्रोम यांच्यात कनेक्शन जाणून घेण्यासाठी हा रिसर्च केला.

टाइप २ डायबिटीसचा धोका कमी

या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, कॉफीमध्ये पॉलीफेनॉल्स खासकरून फेनोलिक अॅसिड आणि फ्लेवोनोइडमध्ये असतात. ज्यामुळे जे लोक कमी प्रमाणात कॉफीचं सेवन करतात, त्यांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो.

मृत्यूदरात कमतरता

आपल्या रिसर्चदरम्यान प्राध्यापक ग्रोसो यांना असंही आढळलं की, ज्या क्षेत्रांमध्ये कॉफी कमी प्रमाणात घेतली जाते, तिथे मृत्यूदर फार कमी असतो. हे तथ्य तपासून बघण्यासाठी ग्रोसो यांनी स्पेनच्या टॉलेडो युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक ऐस्टेफेनिया यांच्या रिसर्च डेटाची मदत घेतली.

(Image Credit : mdlinx.com)

हा रिसर्च १३व्या यूरोपियन न्यूट्रिशन कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात आला. ही कॉन्फरन्स फेडरेशन ऑफ यूरोपियन न्यूट्रिशन सोसायटीज द्वारे आयरलॅंडच्या डबलिनमध्ये आयोजित करण्यात आली होती.

या रिसर्चमध्ये २२ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांच्याकडून कलेक्ट करण्यात आलेल्या डेटामधून असा निष्कर्ष निघाला की, दिवसातून एक ते चार कप कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी होतो. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग