शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
2
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
3
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
4
संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
5
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
6
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
7
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
9
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
10
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
11
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...
12
एका शेअरवर ₹११७ चा डिविडेंड देतेय कंपनी, रेकॉर्ड डेट आता जास्त दूर नाही; पाहा कोणता आहे शेअर?
13
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
14
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
15
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
16
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
17
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
18
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
19
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
20
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन

कॉफीमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 17:26 IST

कॉफी प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. त्यांनी कॉफी पिणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला कॉफीचा कोलेस्ट्रॉलवर कसा परिणाम होतो ते सांगणार आहोत. याशिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचे उपायदेखील सांगणार आहेत.

मोठ्या संख्येने लोकांना दिवसाची सुरुवात कॉफीने करायला आवडते. हे सकाळच्या सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. काही लोकांना कॉफीची इतकी आवड असते की ते कामाच्या ठिकाणीही अनेक कप कॉफी पितात. कॉफीचे आपल्या आरोग्यासाठी काही फायदे आहेत, पण त्याचे सेवन मर्यादेतच केले पाहिजे. जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की कॉफी प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. त्यांनी कॉफी पिणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला कॉफीचा कोलेस्ट्रॉलवर कसा परिणाम होतो ते सांगणार आहोत. याशिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचे उपायदेखील सांगणार आहेत.

कॉफी आणि कोलेस्टेरॉलचे कनेक्शनमेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंतच्या अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की, कॉफी प्यायल्याने व्यक्तीच्या शरीरातील सीरम कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. तुम्ही कोणत्या प्रकारची कॉफी आणि कोणत्या प्रमाणात पीत आहात यावरही हे अवलंबून असते. विशेष बाब म्हणजे कॉफी महिला आणि पुरुषांच्या कोलेस्टेरॉल पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते. 2016 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार कॉफीचे सेवन केल्याने खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे कोलेस्टेरॉलवर परिणाम होत नाही. परंतु कॉफी बीन्समध्ये आढळणारे तेल कोलेस्टेरॉल वाढवण्यास जबाबदार आहे.

द इन्स्टिट्यूट फॉर सायंटिफिक इन्फॉर्मेशन ऑन कॉफी (ISIC) च्या मते, कॉफीमध्ये असलेल्या डायटरपेन्समुळे कोलेस्टेरॉल वाढते. 2011 च्या अभ्यासानुसार, स्कॅन्डिनेव्हियन उकडलेली कॉफी, तुर्की कॉफी, फ्रेंच प्रेस कॉफी कमी प्रमाणात खावी. कोलेस्टेरॉलच्या पातळीवर त्यांचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. तर एस्प्रेसो, फिल्टर कॉफी आणि इन्स्टंट कॉफीमध्ये डायटरपिन फार कमी प्रमाणात आढळतात, ज्यामुळे कोलेस्टेरॉलमध्ये काहीही फरक पडत नाही. त्यामुळे कॉफी विचारपूर्वक प्यावी.

या टिप्ससह कोलेस्टेरॉल नियंत्रित करा.

- दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.

- शारीरिकरित्या सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा.

- जास्त वेळ एका जागी बसणे टाळा.

- सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे.

- निरोगी चरबीयुक्त पदार्थ खा.

- कॉफीचे जास्त सेवन टाळा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स