Kidney Stone Coffee : किडनी स्टोन ही एक अशी समस्या आहे जी झाली तर व्यक्तीला असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. वेदना अशा की, व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी येईल. किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यातीलच एक उपाय म्हणजे कॉफी आहे. जर तुमच्या किडनीमधील स्टोनचा आकार जास्त मोठा नसेल तर कॉफीच्या मदतीनं ही समस्या दूर केली जाऊ शकते. पण हा उपाय करत असताना एक चूक महागात पडू शकते. ही चूक काय आणि कॉफीनं किडनी स्टोन कसे बाहेर पडतील हे जाणून घेऊ.
किडनी स्टोनची लक्षणं
किडनी स्टोन झाल्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. किडनी स्टोन झाल्यावर काही लक्षणंही शरीरात दिसू लागतात. जसे की, कंबरेच्या खाली वेदना, पोटाच्या मागच्या बाजूमध्ये वेदना, पोटात वेदना, लघवी करताना त्रास होणे, मळमळ, उलटी, ताप, थंडी वाजणे, लघवीतून रक्त किंवा फेस येणं, लघवी करताना अडचण होणे इत्यादी.
कॉफीमुळेही तयार होतो स्टोन
यूरोलॉजिस्ट डॉक्टर अमित बंसल यांनी सांगितलं की, कॉफीमुळेही किडनी स्टोन होऊ शकतो आणि स्टोन बाहेरही पडू शकतो. जर कॉफी पिताना तुम्ही एक चूक केली तर किडनीमध्ये स्टोन तयार होऊ शकतो. पण असं त्या लोकांमध्ये जास्त होतं, ज्यांचं हायड्रेशन खराब असतं, जे लोक कमी पाणी पितात.
हायड्रेट रहा
कॉफी एक डायर्यूटिक आहे, ज्यामुळे लघवी जास्त तयार होते आणि लघवीच्या प्रेशरसोबत छोटे छोटे स्टोन बाहेर निघून जातात. जर तुम्ही कॉफी जास्त पित असाल तर भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड रहा. असं केलं तर स्टोन होण्याचा धोका कमी होईल आणि जास्त लघवीद्वारे छोटे स्टोन बाहेर पडतील.
स्टोन कसे तयार होतात?
किडनीमध्ये तयार होणारे स्टोन सॉलिड मांस किंवा क्रिस्टलपासून तयार होतात. हे मिनरल, अॅसिड आणि मिठापासून तयार होतात. हे स्टोन वाळूच्या दाण्यांसारखे ते गोल्फ बॉल इतक्या आकाराचे असू शकतात. अनेकदा किडनीमध्ये मिनरल्स जमा होतात, जे स्टोन बनवतात.
किडनी स्टोनची कारणं आणि बचावाचे उपाय
किडनी स्टोन होण्याची कारणं अनेक आहेत. महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये किडनी स्टोनची समस्या जास्त बघायला मिळते. अशात जर तुम्हालाही किडनी स्टोनची समस्या असेल तर बाहेरचं खाणं, जास्त साखर, मीठ आणि प्रोटीन असलेले पदार्थ खाणं टाळा. तेच किडनी स्टोनने पीडित लोकांनी आपल्या डाएटवर खास लक्ष द्यावं. सोबतच एक्सरसाइज आणि योगाही करावा.
या गोष्टींमुळे वाढू शकते समस्या
बीफ, चिकन, अंडी, दूध, चीज, दही, पालक इत्यादीमुळे लघवीमध्ये यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्हाला जर किडनी स्टोनची समस्या असेल तर हे पदार्थ टाळावे. त्याशिवाय डॉक्टरांना संपर्क करा.
किडनी स्टोनपासून कसा कराल बचाव
किडनी स्टोनच्या समस्येपासून बचाव करायचा असेल तर शरीरात पाण्याची कमतरता नसावी. त्यासाठी दिवसातून कमीत कमी 8 ग्लास पाणी प्यावे. पाण्यासोबतच फळांचा ज्यूसही डाएटमध्ये सामिल करा.