कोकोनट मिल्क म्हणजेच नारळाच्या दुधाला दक्षिण भारत आणि कोंकणी खाद्य पदार्थांमध्ये महत्वाचं स्थान आहे. भारतासोबतच लोकप्रिय होत असलेल्या थाई फूडमध्येही नारळाच्या दुधाच्या समावेश केला जातो. यामागे नारळाचे ते गुण असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. नारळाचं दूध पदार्थांमध्ये वापरल्यास आरोग्याला होणारे फायदे जाणून घेऊ.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी

(Image Credit : theconversation.com)

नारळाचं दूध आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. नारळाच्या दुधात ल्यूरिक अ‍ॅसिड असतं, जे एकप्रकारचं फॅटी अ‍ॅसिड असतं. याचा शरीरातील लिपिड आणि कोलेस्ट्रॉल प्रमाणावर सकारात्मक प्रभाव पडतो. नारळाचं दूध असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होत.

वजन कमी करण्यासाठी

नारळाचं दूध हे वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. खोबऱ्यात कॅप्रिक आणि कॅप्रेलिक अ‍ॅसिड असतं. जे किटोन्स हार्मोन्सची निर्मितसाठी मदत करतं. किटोन्स असं हार्मोन आहे ज्याने जेवण केल्यावर लवकर संतुष्टीची जाणीव होते आणि लोक ओव्हरइंटिंग करत नाहीत. अशाप्रकारे तुम्ही तुमचं वजन वाढू देणार नाही. 

डायबिटीसमध्ये सेवन करता येतं नारळाचं दूध

नारळाचं दूध ताज्या नारळापासून तयार केलं जातं. याचं सेवन केल्याने ब्लड ग्लूकोजचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. खोबऱ्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरात इन्सुलिन रिलीज प्रक्रियेत सुधारणा करतं आणि याप्रकारे तुमचं ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही.

फंगस आणि बॅक्टेरियापासून बचाव

शुद्ध खोबऱ्यापासून तयार पदार्थ शरीराची इम्यूनिटी वाढवण्यासोबत बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनपासून तुमची रक्षा करण्याचं काम करतात. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, त्वचेशी संबंधित समस्या, सूज आणि पुरळ यांसारख्या समस्यांमध्ये खोबऱ्याचं तेल, नारळाचं पाणी आणि नारळाचं दूध फायदेशीर ठरतं.


Web Title: Coconut milk benefits for better blood glucose management and healthy heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.