युद्ध जिंकणार! 'या' देशात कोरोनाची लस अंतिम टप्यात; २० कोटी लसींचे डोस तयार होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 16:10 IST2020-07-12T15:55:41+5:302020-07-12T16:10:00+5:30

CoronaVirus News and Latest Upadte : तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी ४० हजारांपेक्षा जास्त लोकांना डोस देण्यात येणार आहे.

China cansino biologics company to create 20 crore vaccine dosage up | युद्ध जिंकणार! 'या' देशात कोरोनाची लस अंतिम टप्यात; २० कोटी लसींचे डोस तयार होणार

युद्ध जिंकणार! 'या' देशात कोरोनाची लस अंतिम टप्यात; २० कोटी लसींचे डोस तयार होणार

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. जगभरातील अनेक देशातील लोकांचे लक्ष कोरोनाची लस कधी येणार या कडे लागले आहे. अमेरिका, भारत, चीन, लंडन, रशिया या देशातील तज्ज्ञ कोरोनावर औषध आणि लस शोधण्याच्या शर्यतीत पुढे आहेत. ज्या देशातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला.  त्या चीनमध्येही मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि कोरोना लस तयार करण्याची तयारी सुरू आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, कॅन्सिनो बायोलॉजिक्स नावाची कंपनी परदेशात लसीची मोठी चाचणी घेण्यासाठी ब्राझील, चिली, सौदी अरेबिया आणि रशियाशी चर्चा करत आहे. 

सरकारने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये करोना संक्रमणाचा वेग सध्या मंदावला आहे. लसीची चाचणी करताना ज्या ठिकाणच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या ठिकाणच्या लोकांवर चाचणी करावी लागते. म्हणून चीन परदेशात चाचणी करण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या ब्राझिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्यामुळे आता ब्राझिल कोरोना लसीच्या चाचणीसाठी उत्तम ठरणार आहे. CanSino Biologics चे सह-संस्थापक किउ डोंग्झू यांनी परदेशात चाचणीच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.

डोंग्झू यांनी सांगितले की, तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल लवकरच सुरू होईल. त्यासाठी ४० हजारांपेक्षा जास्त लोकांना डोस देण्यात येणार आहे. CanSino Biologics या कंपनीने Ad5-nCov नावाची कोरोना लस विकसित केली आहे. Ad5-nCov ही पहिली लस आहे ज्याची चाचणी चीनमधील रुग्णांवर करण्यात आली.

कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार Ad5-nCov लसीच्या दुसर्‍या टप्प्याच्या चाचणी दरम्यान, ५०० पेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली, ज्याचे सकारत्मक परिणाम दिसून आले. ही कंपनी चीनमध्ये एक नवीन फॅक्टरी निर्माण करणार आहे. २०२१ च्या सुरूवातीस, या लसीचे उत्पादन येथे सुरू होईल. साधारणपणे एका वर्षात या कंपनीने १० ते २० कोटी लसीचे डोस तयार केले जातील. 

दरम्यान कोरोनावर उपचारांसाठी लस तयार करण्यासाठी मॉडर्ना, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि भारत बायोटेक कंपनीची लस शर्यतीत पुढे आहे. लवकरच या लसीचे अंतीम टप्प्यातील ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. त्यात रेमडिसीवर, फेबिफ्लू, डेक्सामेथासोन या औषधांचा समावेश आहे. अनेक विदेशी कंपन्यांचे जेनेरिक औषध तयार करण्यासाठी भारताकडून परवानगी देण्यात आली आहे.  

खुशखबर! कोरोना विषाणूंना नष्ट करणार 'कोरोनाविर'; 'या' औषधानं रोखता येईल विषाणूंची वाढ

CoronaVirus News : लस पुढील वर्षापर्यंत येण्याची शक्यता नाही - केंद्र सरकार

Web Title: China cansino biologics company to create 20 crore vaccine dosage up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.