शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे, लहानपणी मैदानाचा, खेळाचा, व्यायामाचा वाराच तुम्हाला लागला नाही?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 19:40 IST

शाळकरी वयातला व्यायाम, खेळ तुमची भविष्याची चिंता मिटवतो..

ठळक मुद्दे लहानपणी व्यायाम केलेला असला तर मोठेपणीही त्याचे फायदे दिसतात.व्यायाम सोडलेला असला तरीही.निगेटिव्ह इफेक्टस कमी होतात..लठ्ठपणाचं प्रमाण कमी राहातं.हाडे मोडण्याचं प्रमाण कमी होतं.चयापचय क्रिया तुलनेनं चांगली राहते.

- मयूर पठाडेतुम्ही रोज किती व्यायाम करता? सॉरी. तुम्ही रोज व्यायाम करता का? जाऊ द्या, आता नसाल करात.. तुमच्या लहानपणी तरी तुम्ही व्यायाम करीत होता का? तुम्हाला सांगायला आॅकवर्ड वाटत असेल तर हेही जाऊ द्या. मला सांगा, तुमची मुलं तरी व्यायाम करतात का?.व्यायाम म्हणजे रोज उठून जोर बैठकाच काढायला पाहिजे किंवा जिममध्येच जायला पाहिजे असं नाही. कुठलाही मैदानी खेळ किंवा जॉगिंग, रनिंग.. ज्यामुळे शरीराची हालचाल होईल, घाम निघेल असं काही शारीरिक एक्झर्शन तुमची मुलं करतात का?- करत असतील तर चांगलंच आहे. आणि करत नसतील तर ती आवड पालक म्हणून आपण त्यांच्यात निर्माण केली पाहिजे. त्यासाठी आपणही थोडा व्यायाम केला तरी काही हरकत नाही.व्यायाम का करायचा?- सगळ्यांनाच ते माहीत आहे.व्यायाम का होत नाही?त्यात बºयाचदा आरंभशुरपणाच जास्त का असतो?- त्याचीही कारणं तुम्हाला माहीत आहेत.पण लहानपणापासून व्यायामाची सवय आहे.नुकत्याच झालेल्या संशोधनातूनही हे सिद्ध झालं आहे.लहानपणी केलेला व्यायाम पुढे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातही आपल्याला फायदेशीर ठरतो. नंतर तुम्ही व्यायाम बंद केला तरी. म्हणजे त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होणार नाही, पण अगोदर केलेल्या व्यायामाचा फायदा होतोच होतो.लहानपणी तुम्ही व्यायाम केलेला असला तर तुमच्या शरीराला आणि मुख्य म्हणजे तुमच्या हाडांनाही ती सवय झालेली असते. ती बळकट होतात. एवढंच नाही, आपल्या हाडांच्या ‘मेमरी’तही ते फिट बसतं.समजा, नंतरच्या आयुष्यात तुम्ही व्यायाम सोडला, तुमची जीवनशैली बिघडली, तरी त्यामुळे त्याचा म्हणावा तितका निगेटिव्ह परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही.हाडे मोडण्याचं प्रमाण कमी होतं. तुमची चयापचय क्रिया तुलनेनं चांगली राहते.त्यामुळे व्यायाम मस्ट.कोणत्याही वयात.लहान वयात तर अधिकच.त्यामुळे तुमच्या मुलांनाही व्यायामाची सवय लावा.तुम्हीही त्यांच्याबरोबर व्यायामाला, खेळायला, फिरायला जा..आणि भविष्याची काळजी न करता बिनधास्त राहा.