शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

मोतीबिंदुच्या समस्येवर शास्त्रज्ञांचा नवा शोध, ना ऑप्रेशन ना ट्रीटमेंट फक्त 'हे' औषध वापरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 5:30 PM

कित्येक वेळा नागरिक ऑपरेशनच्या (Cataracts operation) भीतीने यावर इलाज करण्यास नकार देतात; मात्र संशोधकांनी आता अशा गोष्टीचा शोध लावला आहे, ज्यामुळे मोतिबिंदूच्या प्रत्येक रुग्णाला (Cataracts patient) शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही.

उतारवयातल्या बहुतांश नागरिकांना जाणवणारी एक समस्या म्हणजे मोतिबिंदू (Cataracts). यामुळे दृष्टी कमकुवत होऊन हळूहळू दिसणं बंद होतं. मोतिबिंदूवर वेळेत इलाज (Cataracts treatment) झाला नाही, तर दृष्टी कायमची जाण्याची शक्यता असते. कित्येक वेळा नागरिक ऑपरेशनच्या (Cataracts operation) भीतीने यावर इलाज करण्यास नकार देतात; मात्र संशोधकांनी आता अशा गोष्टीचा शोध लावला आहे, ज्यामुळे मोतिबिंदूच्या प्रत्येक रुग्णाला (Cataracts patient) शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही.

नेक्युटी फार्मास्युटिकल्स (Necuti Pharmaceuticals) या अमेरिकेतल्या फार्मा कंपनीने एका इम्प्लांटचा (Implant for Cataract) शोध लावला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, याचं नाव एनपीआय-002 (NPI-002) असं आहे. बंदुकीच्या छर्र्‍याप्रमाणे (Pellet to reverse traces of Cataracts) दिसणारं हे इम्प्लांट डोळ्यातला मोतिबिंदू वाढू देत नाही. यामुळेच ऑपरेशनची गरज बरीच कमी होते, असा दावा या कंपनीने केला आहे. लवकरच याची मानवी चाचणी (NPI-002 Human trial) सुरू करण्यात येणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं.

वयाची पन्नाशी पार केल्यानंतर शरीरातल्या अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण कमी होऊ लागतं. यासोबतच डोळ्यांमध्ये कॅल्शियम (Calcium in eyes) जमा होऊ लागतं. यामुळे डोळ्यांची जी नैसर्गिक लेन्स (Natural lens in eyes) असते ती खराब होऊ लागते. डोळ्यांमध्ये मोत्याप्रमाणे पांढरा असा ठिपका दिसू लागतो. यामुळे मोतिबिंदू झालेल्या व्यक्तीला सर्व धूसर दिसू लागतं आणि काही दिवसांनी ऑपरेशनची गरज भासते. ऑपरेशनची जोखीम कमी करण्यासाठी आपलं प्रॉडक्ट अगदीच फायदेशीर ठरणार असल्याचं या कंपनीनं म्हटलं आहे.

एनपीआय-002 हे इम्प्लांट डोळ्यात थेट इंजेक्ट (Pellet injected in eye) केलं जातं. ते थोड्या-थोड्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स सोडत राहतं. अशा प्रकारे ते डोळ्यांतला कॅल्शियमचा स्तर वाढण्यापासून थांबवतं. त्यामुळे बऱ्याच जणांना शस्त्रक्रियेची गरजच भासत नाही किंवा काहींना शस्त्रक्रियेवेळी कमी जोखीम पत्करावी लागते, असा दावा कंपनीने केला आहे. याच्या मानवी चाचणीसाठी ६५ वर्षांहून अधिक वयाच्या ३० व्यक्तींना सहभागी केले जाईल, असं कंपनीने स्पष्ट केलं.

मोतिबिंदूचा विचार करायचा झाल्यास, जगभरात यामुळे सुमारे दोन कोटी व्यक्तींची दृष्टी (Cataracts patients in world) गेली आहे. यामध्ये ५ टक्के अमेरिकी, ६० टक्के दक्षिण आफ्रिकेतल्या आणि दक्षिण अमेरिकेतल्या व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेत मोतिबिंदूंच्या रुग्णांमध्ये महिलांचं प्रमाण अधिक आहे. तसंच एकूण रुग्णांपैकी ६८ टक्के रुग्ण  वर्षांहून अधिक वयाचे आहेत. भारताबाबत बोलायचं झाल्यास, देशातल्या १.२ कोटी दृष्टिहीन नागरिकांपैकी ६६.२ टक्के व्यक्तींची दृष्टी जाण्याचं कारण मोतिबिंदू (Cataracts in India) आहे. दर वर्षी देशात मोतिबिंदूच्या २० लाख नव्या रुग्णांची नोंद होते.

या इम्प्लांटची मानवी चाचणी यशस्वी झाल्यास हा एक मोठा शोध ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जगभरातल्या मोतिबिंदूच्या रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास या कंपनीचं म्हणणं योग्य असल्याचं लक्षात येते. त्यामुळे या इम्प्लांटच्या चाचणीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स