आता वयोवृद्धांपेक्षा जास्त तरूणांना जाळ्यात घेत आहे 'हा' कॅन्सर! - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 11:32 IST2019-08-09T11:27:51+5:302019-08-09T11:32:50+5:30
हा कॅन्सर कोलोन किंवा रेक्टल भागाला प्रभावित करतो. त्यामुळेच या कॅन्सरला कोलोरेक्टल कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सर असं बोललं जातं.

आता वयोवृद्धांपेक्षा जास्त तरूणांना जाळ्यात घेत आहे 'हा' कॅन्सर! - रिसर्च
(Image Credit : www.westcoastcolorectal.com)
बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि इतरही वेगळ्या कारणांमुळे अधिक वयात वृद्धांना होणारे आजार तरूणांनाही होऊ लागले आहेत. सामान्यपणे वयोवृद्धांना होणारा रेक्टल कॅन्सर(मोठया आतडयाचा कर्करोग) हा आता तरूणांमध्येही वेगाने वाढू लागला आहे.
एका रिसर्चनुसार, रेक्टल कॅन्सरच्या केसेस आता ५० पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये कमी आढळत आहेत. तर दुसरीकडे २० ते ३० वयोगटातील तरूणांना या कॅन्सरची लागण होत आहे. हा कॅन्सर कोलोन किंवा रेक्टल भागाला प्रभावित करतो. त्यामुळेच या कॅन्सरला कोलोरेक्टल कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सर असं बोललं जातं.
अमेरिकेचे जर्नल जेएएमए नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये यावर खोलवर चिंता व्यक्ती करण्यात आली आहे. हा कॅन्सर केवळ तरूणांनाच शिकार करतोय असं नाही तर हा कॅन्सर होण्याचा वेगही वाढला आहे. वैज्ञानिकांनुसार, 'आम्हाला वाटलं होतं की, हा आजार काही वर्षात कमी होईल. पण तसं न होतं तरूणांमध्ये हा आजार वाढत जात आहे. हे चिंताजनक आहे'.
या रिसर्चमधून समोर आले की, या कॅन्सरने पीडित तरूण रुग्णांच्या संख्येत साधारण १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच वैज्ञानिकांनी यावर जास्त जोर दिला की, हा कॅन्सर वाढण्याची आकडेवारी समोर आल्यानंतर हे जाणून घेणं अधिक गरजेचं झालं आहे की, तरूणांमध्ये हा कॅन्सर अधिक का वाढतो आहे?
वैज्ञानिकांनी रिसर्चमध्ये उल्लेख केला की, हा कॅन्सर पसरण्याचं कारण लाइफस्टाइल आणि लठ्ठपणा असू शकतं. तसेच टाइप २ डायबिटीसमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो. वैज्ञानिकांनी या कॅन्सरबाबत जागरूकता पसरवण्यावर जोर दिला आहे. जेणेकरून सुरूवातीच्या स्टेजमध्ये याची माहिती मिळावी आणि रूग्णांवर योग्य ते उपचार करता यावेत.