(Image Credit : upi.com)

बदलत्या लाईफस्टाईलमुळे जगभरातील लोकांमध्ये आता हृदयासंबंधी आजार वेगाने वाढत आहेत. आणि यात सर्वात कॉमन आजार म्हणजे हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्यूअर. हार्ट फेल्यूअरला कंजेस्टिव हार्ट फेल्यूअर असंही म्हटलं जातं. कारण हार्ट मसल्सच्या गरजेनुसार, ब्लड पम्प करू शकत नाही. यामुळे हार्ट कमजोर होतं.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, कार्पल टनल सिंड्रोम असलेल्या ज्या रूग्णांनी सर्जरी केली आहे, त्यांना हार्ट फेल्यूअर आणि अमायलॉयडोसिसा धोका अधिक वाढतो. पण हार्ट फेल्यूअरचा धोका कोणत्याही व्यक्तीला कधीही होऊ शकतो. त्यामुळे हार्ट फेल्यूअरबाबत माहिती असणं गरजेचं आहे. हार्ट फेल्यूअरची काही लक्षणे खालीलप्रमाणे सांगत आहोत.

हार्ट फेल्यूअरची लक्षणे

(Image Credit : University of Toronto)

- कंजेस्टिव हार्ट फेल्यूअरचा सर्वात जास्त प्रभाव फुप्फुसांवर, पायांवर आणि पोटावर पडतो.

- यात पीडित व्यक्तीला सतत थकवा आणि कमजोरी जाणवते.

- तसेच यात थोडं काम केल्यावरही धाप लागण्याची समस्या होते आणि श्वास भरून येतो.

- पाय आणि पोटावर सूज येते, ज्यामुळे चालताना फार त्रास होतो.

- हार्ट फेल्यूअरच्या स्थितीत घशात खवखव होऊ लागते आणि सतत खोकलाही येतो.

- कधी कधी हृदयाच्या ठोक्यांचा वेग खूप वाढतो तर कधी अचानक फार कमी होतो.

हार्ट अटॅकपेक्षा वेगळी असतात ही लक्षणे

(Image Credit : The Independent)

सामान्यपणे हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्यूअरला एकच समजून घेतात. पण असं नाहीय. हार्ट अटॅक ब्लड क्लॉटमुळे येतो. हा क्लॉट कोरोनरी आर्टरीजमध्ये तयार होता, ज्यामुळे योग्य प्रमाणात ऑक्सिजन हार्टपर्यंत पोहोचत नाही. तर हार्ट फेल्यूअर वेगवेगळ्या कारणांनी होतो. जसे की, डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर किंवा कोरोनरी आर्टरी डिजीज.

हार्ट फेल्यूअरवर उपचार

(Image Credit : Pamper.My)

हार्ट फेल्यूअरच्या स्थितीमध्ये लक्षणे दिसली तर अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. त्यासोबत लाईफस्टाईलमध्ये, खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करणेही गरजेचा असतो. वेळेवर झोप घेणे, रोज एक्सरसाइज करणेही महत्वाचे आहे. हिरव्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करावा.


Web Title: Carpal tunnel syndrome increases heart failure risk know the symptoms
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.