कोरोनाच नाही तर 'या' आजाराने उद्भवते घसा सुजण्याची समस्या; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 10:06 AM2020-06-01T10:06:52+5:302020-06-01T10:52:48+5:30

या आजारात सुरुवातीची लक्षणं ही खूपच साधी असतात. मानेला सूज आणि वेदना होतात.

Cancer indicator persistent swollen lymph nodes myb | कोरोनाच नाही तर 'या' आजाराने उद्भवते घसा सुजण्याची समस्या; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

कोरोनाच नाही तर 'या' आजाराने उद्भवते घसा सुजण्याची समस्या; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार असो सुरूवातीला लक्षणं ओळखणं कठीण असतं. कॅन्सरची लक्षणं सुरूवातीला ओळखली नाही तर उपचार करणं अवघड असतं. कॅन्सरच्या अनेक प्रकारांमधील एक प्रकार म्हणजे लिंफोनिया कॅन्सर. या आजारात सुरुवातीची लक्षणं ही खूपच साधी असतात. मानेला सूज आणि वेदना होतात. या समस्येला सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष केलं जातं. 

आपल्या शरीरातील लिम्फ नोड्समध्ये दिसणारा कॅन्सर हा जीवघेण्या आजाराची सुचना देत असतो. या पेशी ट्यूमरजवळ लिंफ नोड्समध्ये दिसून येतात. तेव्हा हा जीवघेणा कॅन्सर पसरण्याची सुरूवात असते.  तपासणीदरम्यान कॅन्सरच्या पेशींची वाढ जास्त प्रमाणात झाली नाही, असं डॉक्टरच्या निदर्शनास आल्यास तुम्ही या आजारापासून वाचू शकता. जाणून घ्या या आजाराच्या लक्षणांबाबत.

घश्यात तीव्र वेदना

खोकला येणे

गिळण्यास अडचण 

घशात खवखव होणं

वजन कमी होणं

जबड्यात वेदना

थुंकीत रक्त येणं

कानामध्ये दुखणं.

उपाय

केमोथेरेपीचा वापर लिंफोनिया कॅन्सरच्या आजारात केला जाऊ शकतो.  यातील घटक घशातील कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्यात सहायक असतात. 

ऑपरेशनद्वारे घशाच्या कॅन्सरची गाठ काढली जाऊ शकते. गाठीपासून मुक्तता मिळण्यासाठी, थायरॉयडसारखे इतर तंतू अथवा भाग काढण्याची गरज पडू शकते. हे विकसित होणाऱ्या गाठीच्या आकारावर अवलंबून असते.  लिंफोनिया कॅन्सरचा प्रसार पुढे टाळण्यासाठी शेजारील लिंफ ग्रंथीसुद्धा काढाव्या लागू शकतात.

लिंफोनिया कॅन्सरसाठी विकिरण पद्धतीचा उपचारात वापर केला जातो. यामध्ये गामा किरणांसारख्या किरणांच्या नियंत्रित मात्रांचे वापर करून विशिष्ट भागांमध्ये घशाच्या कॅन्सरच्या पेशींंना लक्ष करून नष्ट केले जाते.

पावसाळ्यात कोरोना विषाणूंचा धोका अधिक तीव्रतेने जाणवणार? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

कोरोना विषाणूचं संक्रमण की सामान्य सर्दी ताप; दवाखान्यात न जाता कसं ओळखाल?

Web Title: Cancer indicator persistent swollen lymph nodes myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.