बीट आणि गाजर खाल्ल्याने खरंच डोळ्यांची दृष्टी वाढते का? जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:20 IST2024-12-19T12:20:02+5:302024-12-19T12:20:37+5:30

Carrot And Beetroot For Eye Care : खरंच गाजर आणि बिटाने डोळ्यांची दृष्टी चांगली राहते का? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

Can eating carrots and beetroot really improve eyesight? | बीट आणि गाजर खाल्ल्याने खरंच डोळ्यांची दृष्टी वाढते का? जाणून घ्या फायदे!

बीट आणि गाजर खाल्ल्याने खरंच डोळ्यांची दृष्टी वाढते का? जाणून घ्या फायदे!

Carrot And Beetroot For Eye Care : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, आजकाल कमी वयातच लोकांना चष्मा लागतो. दूरचं किंवा जवळचं बघण्यासाठी लोक चष्म्याचा वापर करतात. याची कारणे वेगवेगळी असली तरी मुख्य कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनात खाण्या-पिण्याची काळजी न घेणे हे आहे. अशात एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि दृष्टी चांगली ठेवण्यासाठी गाजर आणि बिटाचं सेवन करा. पण खरंच गाजर आणि बिटाने डोळ्यांची दृष्टी चांगली राहते का? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

बीट आणि गाजराचे फायदे

बीट आणि गाजर खाणं आपल्यासाठी शरीरासाठी फार फायदेशीर ठरतं. सामान्यपणे दोन्ही गोष्टी ज्यूसच्या रूपात प्यायल्या जातात किंवा सलाद म्हणून खाल्ल्या जातात. महत्वाची बाब म्हणजे दोन्हीमुळे वजन कमी करण्यासही मदत मिळते. कारण दोन्हींमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. तसेच यांमध्ये कॅलरीही कमी असतात.

जर सकाळी बीट किंवा गाजराचा ज्यूस प्याल तर याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. गाजरामध्ये बिटाच्या तुलनेत पाणी आणि इतर व्हिटॅमिन्स जास्त असतात. तर बिटामध्ये प्रोटीन, आयर्न, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फोलेट अधिक प्रमाणात असतं.

गाजर आणि बिटाने डोळ्यांची दृष्टी वाढते का?

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या दृष्टीसाठी जबाबदार रेटिनामध्ये एक महत्वाची भूमिका बजावतं. हेच कारण गाजर डोळ्यांसाठी फायदेशीर मानलं जातं. पण हेही लक्षात घ्यायला हवं की, फक्त गाजर खाल्ल्यानेच डोळ्यांची दृष्टी सुधारेल असं नाही. यासाठी संतुलित आहार आणि हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करणंही गरजेचं आहे.

बीट आणि डोळ्यांचं आरोग्य

बिटामध्ये काही पोषक तत्वअसे असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बिटामध्ये बिटाइन, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फोलिक अ‍ॅसिडसारखे पोषक तत्व असतात. जे डोळ्यांच्या कोशिका डॅमेज होण्यापासून बचाव करतात. तसेच ब्लड सर्कुलेशन वाढवतात. या तत्वांनी डोळ्यांच्या आजूबाजूचे टिश्यूजही मजबूत होतात आणि त्यांची काम करण्याची क्षमता अधिक वाढते.

गाजर आणि बीट दोन्हीही डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी केवळ बीट किंवा गाजर खाऊन भागणार नाही. डोळे चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमितपणे डोळ्यांची एक्सरसाईजही गरजेची असते. 

Web Title: Can eating carrots and beetroot really improve eyesight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.