डायबिटीस रूग्ण कलिंगड खाऊ शकतात का? जाणून घ्या प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 15:10 IST2024-04-13T15:10:24+5:302024-04-13T15:10:46+5:30
डायबिटीस असलेल्या रूग्णांना आपल्या आरोग्याची आणि डाएटची खूप काळजी घ्यावी लागते. खाण्या-पिण्याच्या चुकीमुळे शुगर लेव्हल कमी जास्त होऊ शकते.

डायबिटीस रूग्ण कलिंगड खाऊ शकतात का? जाणून घ्या प्रमाण
उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक शरीर थंड ठेवण्यासाठी कलिंगड खातात. कारण यात भरपूर पाणी आणि फायबर असतं. तसेच यात नॅचरल स्वीटही असतं. डायबिटीसच्या रूग्णांना आपल्या खाण्या-पिण्याची आणि लाइफस्टाईलची खूप काळजी घ्यावी लागते. जर हा आजार कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर आहार चांगला असणं महत्वाचं आहे.
डायबिटीस असलेल्या रूग्णांना आपल्या आरोग्याची आणि डाएटची खूप काळजी घ्यावी लागते. खाण्या-पिण्याच्या चुकीमुळे शुगर लेव्हल कमी जास्त होऊ शकते.
ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हेल्दी डाएट गरजेची आहे. खाण्यात जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे.
पण काही अशीही फळं असतंत जी नॅचरल गोड असतात. कलिंगडही त्याच फळांपैकी एक आहे ज्यात फायबर आणि पाणी भरपूर असतं. हे फळं डायबिटीसचे रूग्ण खाऊ शकतात.
कलिंगडामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स 70 ते 72 दरम्यान असतो. कलिंगडात पाणी भरपूर असल्याने याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे डायबिटीसचे रूग्ण हे फळ खाऊ शकतात.
डायबिटीसचे रूग्ण दिवसातून साधारण 100 ते 150 ग्राम कलिंगड खाऊ शकतात. याचा ज्यूस पिऊ नये कारण यात फायबर अजिबात नसतं.