शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

खुशखबर! भारतातील सर्वात स्वस्त कोरोनाचं औषध Zydus Cadila कंपनीकडून लॉन्च; वाचा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 16:02 IST

CoronaVirus : कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी करत असलेल्या औषधाबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे.

भारतासह जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. कोरोना विषाणूंची लागण झाल्यानंतर रुग्णांना वाचवण्यासाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी जगभरातील देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत.  कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टेंसिंगचा वापर केला जात आहे. तरिही कोरोना विषाणूंचा प्रसार वेगाने होत असून मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान कोरोना विषाणूंचा प्रभाव कमी करत असलेल्या औषधाबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे.

भारतातील फार्मा कंपनी झायडस कॅडिलाने (Zydus Cadila) गिलियाड सायन्सेस अँटीवायरल औषध रेमडेसिव्हीरचे (Remdesivir) सर्वात स्वस्त जेनेरिक औषध लाँच केले आहे. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार 100mg औषधाची किंमत 2 हजार 800 रुपये आहे. जगभरातील अनेक देशातील रुग्णालयात चाचणी दरम्यान रेमडेसिव्हिर हे औषध परिणामकारक ठरलं आहे.  रेमडेसिव्हीरमुळे कोरोनाच्या लक्षणांचा कालावधी कमी होऊ शकतो. उपचारांदरम्यान सकारात्मक परिणाम दिसून आल्यानं मागणी वाढली आहे. कोरोनासाठी कोणतेही इतर उपचार नसल्यामुळे या औषधाची मागणी भारतातील अनेक राज्यांमध्ये वाढली आहे.

अमेरिकेतील गिलियाड सायन्सेसने इबोलाच्या उपचारासाठी रेमडेसिव्हीर औषध तयार केले होते. आता भारतातील सिप्ला, जुबिलंट लाइफ, हेटरो ड्रग्स, मायलोन या कंपन्यांना रेमडेसिव्हीरचे  जेनेरिक औषध  भारतात तयार करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान Zydus Cadila ने आपली कोव्हि़ड-19 लस ZyCoV-D ची मानवी चाचणी सुरू केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशातील विविध भागांतील हजारो लोकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.  या लसीच्या मानवी परिक्षणाला सुरूवात झाली असून रोगप्रतिकारकशक्ती आणि इम्युनोजेनिसिटी किती प्रमाणात वाढते या आधारावर मुल्यांकन केलं जाणार आहे.

दरम्यान भारतात गेल्या 24 तासात 66,999 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, 942 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 23,96,638 पर्यंत पोहोचला आहे. त्यापैकी, 16,95,982 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 6,53,622 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आत्तापर्यंत 47,033 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

हे पण वाचा-

स्वयंपाकघरातील 'या' ५ पदार्थांच्या सेवनानं फुफ्फुसांना आजारांपासून ठेवा दूर

धूळीप्रमाणे हवेत मिसळल्यानं वाढतंय कोरोना विषाणूंचं संक्रमण? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

तुम्हालाही दाढी केल्यानंतर जळजळ आणि खाज येते? 'या' ५ उपायांनी समस्या होईल कायमची दूर

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या