धोका वाढला! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर; ब्राझिलमध्ये सर्वाधिक प्रकरणं; भारतावर असा होतोय परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 10:36 AM2021-03-14T10:36:26+5:302021-03-14T10:52:19+5:30

CoronaVirus News & Latest Updates : ब्राझिलमध्ये भारतापेक्षाही जास्त रुग्णांची नोंद झाली असून अमेरिकेनंतर आता दुसऱ्या स्थानावर आहे.

Brazil surpasses india to become the second worst hit country from coronavirus pandemic after us | धोका वाढला! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर; ब्राझिलमध्ये सर्वाधिक प्रकरणं; भारतावर असा होतोय परिणाम

धोका वाढला! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर; ब्राझिलमध्ये सर्वाधिक प्रकरणं; भारतावर असा होतोय परिणाम

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव आधीपेक्षा जास्त संक्रामक असल्याचे दिसून येत आहे. ब्राझिलमध्ये कोरोनाचा कहर वाढला असून शनिवारी ७६,१७८ नवीन केसेस समोर आल्या असून १,९९७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात १,१४,३९,५५८ पॉझिटीव्ह  रुग्ण  आणि २७७,१०२ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. याआधीही १२ मार्चला देशात ८५,६६३ रुग्ण समोर आले होते आणि २,२१६ लोकाना मृत्यूचा सामना करावा लागला. ब्राझिलमध्ये भारतापेक्षाही जास्त रुग्णांची नोंद झाली असून अमेरिकेनंतर आता दुसऱ्या स्थानावर आहे.

देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्यव्यवस्थेत वाढ करण्यात आली  आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही ब्राझिलच्या या स्थितीबाबत धोक्याचा इशारा देत गंभीर पाऊलं उचलणं गरजेचं असल्याचं सांगितले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा वेरिएंट  P1 मुळे देशात रुग्णांची संख्या वाढत आहे. ब्राझिलमध्ये कोरोनाच्या या नव्या वेरिएंटला नाव देण्यात आलं आहे. 

हे पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे आणि जे लोक पहिल्या संसर्गाने बरे झाले आहेत ते देखील असुरक्षित आहेत. सोमवारी राष्ट्रपतींनीही कर्फ्यू  योग्न नसल्याचे पटवून देत म्हणाले की डब्ल्यूएचओला असेही वाटते की लॉकडाऊन पुरेसा नाही कारण त्यामुळे  गरिबांचे नुकसान होते. तर, डब्ल्यूएचओ त्याचा नकारात्मक परिणाम मानतो, पण काही देशांमध्ये प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा मार्ग नाही.

 CoronaVirus News : धोका वाढला! शरीरात १२ आठवडे पडून राहतोय कोरोना; तज्ज्ञांनी सांगितली लॉन्ड कोविडची लक्षणं.....

जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली  असून २१ कोटी लोकसंख्येच्या देशात ४ टक्क्यांपेक्षा कमी लोकांना लसी दिली जाते. आतापर्यंत फक्त २६ लाख लोकांना दोन्ही डोस प्राप्त झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी ऑक्सफोर्ड लसीवा नुकतीच मंजूरी देण्यात आहे आणि हे डोस भारतकडून पाठवले गेले आहेत. 

हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...

दरम्यान राज्यात शुक्रवारी २ लाख ५४ हजार ९६५ जणांना लस देण्यात आली. यातील २ लाख ४६ हजार ९५४ जणांना कोविशिल्ड, तर ८ हजार २  जणांंना कोव्हॅक्सिन लसीचा डाेस देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण २६ लाख ८९ हजार ९२२ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली. (Vaccination of more than 26 lakh people in the state)

काेराेनाचा संसर्ग वाढत चालला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण माेहीम वेगात सुरू आहे. मुंबईतही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. १ मार्चपासून ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे.  

Web Title: Brazil surpasses india to become the second worst hit country from coronavirus pandemic after us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.