Boxer abid khan : नॅशनल लेव्हल बॉक्सरवर रिक्षा चालवण्याची वेळ, कहाणी ऐकताच आनंद महिंद्रांनी केलं असं काही.....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 04:01 PM2021-04-18T16:01:33+5:302021-04-18T16:31:02+5:30

boxer abid khan : गेल्या काही दिवसांपासून आबिद खान यांचा जीवन प्रवास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आबिद खान चंडीगढमधून इंटर यूनिव्हर्सिटी आणि नॉर्थ इंडिया बॉक्सिंग चॅम्पियन राहिले आहेत.

boxer abid khan : Anand mahindra extends helping hand to former national boxer abid khan | Boxer abid khan : नॅशनल लेव्हल बॉक्सरवर रिक्षा चालवण्याची वेळ, कहाणी ऐकताच आनंद महिंद्रांनी केलं असं काही.....

Boxer abid khan : नॅशनल लेव्हल बॉक्सरवर रिक्षा चालवण्याची वेळ, कहाणी ऐकताच आनंद महिंद्रांनी केलं असं काही.....

Next

प्रख्यात उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गरीबीशी झगडणा माजी राष्ट्रीय बॉक्सर आबिद खानला मदतीचा हात दिला आहे. आबिद हा एनआयएसचा पात्र प्रशिक्षकही आहे परंतु त्याला कुठेही नोकरी मिळाली नाही आणि वाहन चालवून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची भूक भागवत  आहे. 

युट्यूब चॅनल  'Sports Gaon'चे सौरभ दुग्गल यांनी ट्विटरवर आबिदच्या शोकांतिकेचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यावर पुन्हा ट्विट करत आनंद महिंद्राने लिहिले की, 'त्यांची कहाणी आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद सौरभ. कोणतीही मदत न मागता मी त्यांचे कौतुक करतो. तरीसुद्धा मी दान देण्यापेक्षा लोकांमध्ये  कौशल्य पाहून उत्कटतेने गुंतवणूक करणे पसंत करतो. कृपया मला सांगा की मी त्यांच्या स्टार्टअप बॉक्सिंग अकॅडमीमध्ये कशी गुंतवणूक करू आणि त्यास समर्थन देऊ. '

नक्की प्रकार काय आहे?

गेल्या काही दिवसांपासून आबिद खान यांचा जीवन प्रवास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आबिद खान चंडीगढमधून इंटर यूनिव्हर्सिटी आणि नॉर्थ इंडिया बॉक्सिंग चॅम्पियन राहिले आहेत. ते एस.डी. कॉलेज चंडीगढचे विद्यार्थी होते. ते पंजाब यूनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व करत होते. १९८८-८९ मध्ये त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियालामधून बॉक्सिंगचा एक कोचिंग डिप्लोमा केला. त्यानंतर पाच वर्षे त्यांनी सेनेच्या टीम्सना ट्रेनिंग देण्याचं काम केलं. इतकं काही करूनही त्यांना त्यांच्या अनुभवानुसार काम मिळालं नाही. 

ते म्हणाले की, 'एक गरीब आणि मिडल क्लास व्यक्तीसाठी गरीबी एक अभिषाप आहे आणि त्याहूनही मोठा अभिषाप खेळ प्रेमी असणं हे आहे. ही केवळ वेळेची बर्बादी आहे. इतकी ख्याती आणि डिप्लोमा असूनही मला एक चांगली नोकरी मिळाली नाही'. आबिद खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी त्यात त्यांचा जगण्याचा संघर्ष सांगितला आहे. ते म्हणाले की, 'मला एकही चांगली नोकरी मिळाली नाही. परिवाराचं पोट भरण्यासाठी अखेर मला हे काम करावं लागलं.

एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

माझं नशीब बरोबर नसेल किंवा माझे कनेक्शन किंवा माझे प्रयत्न ठीक नसतील. मला नाही माहीत. फक्त इतकं माहीत आहे की, मी एक चांगली नोकरी नाही मिळवू शकलो'. 'दु:खं तर होतं. एक स्वप्न होतं की, डिप्लोमा करून मी यालाच आपलं करिअर बनवेल. चांगल्यात चांगला बॉक्सर तयार करणार. पण तसं होऊ शकलं नाही. याचा त्रास तर होतोच'.

बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....

एकीकडे बॉक्सिंगमध्ये करिअर करू न शकल्याचं दु:खं, दुसरीकडे लोकांच्या टोमण्यांनी आबिद यांच्या मनातील स्पोर्ट्ससाठी राहिलेलं प्रेम नष्ट केलं. आज त्यांना दोन मुलं आहेत. त्यांना ते स्पोर्ट्समन बनवणार नाहीत. ते म्हणाले की, 'मी माझ्याच कॉलेजमध्ये चपराश्याची नोकरी मागायला गेलो होतो. ते उलट मला म्हणाले की, मी एक खेळाडू असूनही रस्त्यावर नोकरीची भीक मागत आहे. या उत्तरानंतर माझं मन दुखावलं. मी शपथ घेतली की, आपल्या मुलांना स्पोर्ट्समध्ये कधी टाकणार नाही.

Web Title: boxer abid khan : Anand mahindra extends helping hand to former national boxer abid khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.