शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

शरीराला सकस आहाराची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 2:49 AM

ज्याप्रमाणे एखाद्या कारला धावण्यासाठी अत्युच्च प्रतीच्या इंधनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्याला शरीराला सकस आहाराची गरज असते.

 - डॉ. अभिषेक काटकवारज्याप्रमाणे एखाद्या कारला धावण्यासाठी अत्युच्च प्रतीच्या इंधनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्याला शरीराला सकस आहाराची गरज असते. आरोग्यवर्धक आणि सर्वोत्कृष्ट अन्न ज्यात योग्य प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा समावेश आहे, अशा आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. आपल्या शरीर आणि बुद्धीचे आॅक्सिटेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. शुद्ध साखर आणि संरक्षकांचे अतिप्रमाणातील सेवन शरीराला हानिकारक आहे. आज चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. आपल्या आतड्याच्या आतील आवरणामध्ये सिरोटीन हे रसायन तयार होते. हे केवळ आपल्याला चयापचयास मदत करीत नाही, तर आपले विचार आणि भावना संतुलित ठेवण्यास, तसेच आपली झोप, मूड, भूक, वेदना ग्रहण क्षमता यास नियमित करण्यास मदत करते. लोक तणावात असताना खाण्याकडे का वळतात, यावर अनेक वेळा चिंतन करण्यात आले आहे. आपण जेव्हा दु:खी असतो तेव्हा आपल्याला जास्त आवडणाऱ्या आहाराकडे आपण वळतो.सिरोटीनमुळे तात्पुरता आनंद मिळतो आणि त्यामुळेच असंख्य लोक अन्नाकडे वळतात व त्यांना आलेल्या तणावापासून काही क्षणासाठी सुटका झाल्यासारखी वाटते. बरेच लोक अन्न सहज उपलब्ध असल्याने तणावमुक्तीसाठी जेवण करण्यावर भर देतात. मात्र, यामुळे अ‍ॅनोरेक्झियासारखी समस्या उद्भवू शकते. आपण ग्रहण करीत असलेल्या आहाराकडे आपण किती प्रमाणात आकर्षित आहोत यावर खूप विचार करणे आवश्यक आहे. आपण जे अन्न खातो ते केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खातो की, गरज म्हणून हे ठरविणे महत्त्वाचे आहे. तथापि, शरीराला पोषक नसणाºया अन्नाकडे आकर्षित होणे आणि त्याचे नेहमी सेवन करणे हे आपली बुद्धी, मन, अस्मिता यांच्यासाठी अतिशय हानिकारक आहे.आरोग्यासाठी घातक असलेल्या अन्नाचे सेवन करणे म्हणजे थकवा, चिडचिडेपणा, चिंता, नैराश्य आणि तणाव यांसारख्या विकारांना स्नेहपूर्वक आमंत्रित करणे हे आहे. याउलट प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, तसेच भाजीपाल्यासारखा संतुलित आरोग्यदायी आहार आपल्याला ताजेतवाणे तसेच निरोगी ठेवतो आणि शाश्वत निरोगी तथा आनंददायी जीवन जगणे सुकर करते.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न