शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या प्रकाशामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 17:10 IST

बदललेली जीवनशैली आणि धावपळीच्या दैनंदिन जीवनात अनेक आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. डायबिटिज, सांधेदुखी, अनिद्रा आणि ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात.

बदललेली जीवनशैली आणि धावपळीच्या दैनंदिन जीवनात अनेक आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. डायबिटिज, सांधेदुखी, अनिद्रा आणि ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. सध्या अनेकांना सतावणारी समस्या म्हणजे हाय ब्लड प्रेशर. अनेक औषधं, उपचार करूनदेखील या समस्येपासून सुटका करून घेणं कठिणच. भारतात ब्लड प्रेशरच्या रुग्णांची समस्या वेगाने वाढत आहे. ब्लड प्रेशरचा आजार तसा तर सामान्य वाटतो, मात्र याला वेळीच कंट्रोल केलं तर यामुळे हृदयरोग, स्ट्रोक या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. परंतु एका संशोधनातून ब्लड प्रेशरच्या समस्येबाबत एक नवीन गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, निळ्या प्रकाशात वावरल्याने रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर कमी होतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. ज्याप्रमाणे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी औषधं काम करतात, त्याचप्रमाणे निळ्या प्रकाशाचा फायदा होतो. औषधांमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे निळ्या प्रकाशामुळेही ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये काही ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींवर प्रयोग करण्यात आला. त्यावरून नोंदवण्यात आलेल्या निरिक्षणांमधून निळा प्रकाश ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो, हे सिद्ध झाले. 

'यूरोपीयन जर्नल ऑफ प्रिवेन्टेटिव कार्डियॉलॉजी'मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात सहभागी करून घेण्यात आलेल्या लोकांचं शरीर 30 मिनिटांपर्यंत जवळपास 450 नॅनोमीटरपर्यंत निळ्या प्रकाशाच्या संपर्कात राहिले. जे दिवसा मिळणाऱ्या सुर्याच्या प्रकाशाच्या तुलनेत सारखेच होते. या दरम्यान दोन्ही प्रकाशांच्या परिणामांची तुलना करण्यात आली. सहभागी झालेल्या लोकांचे ब्लड प्रेशर, धमन्यांवर झालेला परिणाम, रक्त वाहिन्या आणि रक्त प्लाज्माचा थर यांचं  मापन करण्यात आलं. त्यावरून नोंदवण्यात आलेल्या निरिक्षणांनुसार निळ्या प्रकाशामुळे सर्व व्यक्तींचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहिल्याचे दिसून आले. 

पराबॅगनी किरणांपेक्षा निळ्या प्रकाशामुळे कॅन्सरचा धोका नसतो. ब्रिटनमधील सरे विश्वविद्यालय आणि जर्मनीमधील हेनरिक हॅनी विश्वविद्यालय डसेलडार्फच्या संशोधकांना असं आढळून आलं की, पूर्ण शरीर निळ्या प्रकाशाच्या संपर्कात आल्याने सहभागी लोकांचं ब्लडप्रेशर जवळपास 8 एमएमएचजीने कमी झालं. तेच साधारण प्रकाशात मात्र त्यावर काही परिणाम झाला नाही. 

रक्तदाबाची कारणे :

रक्तदाब असलेल्या आई-वडिलांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण चार पट अधिक असू शकते. तसेच आई-वडिलांच्या जीवनपद्धती, राहणीमान, खाणे पिणे यांचे अनुकरण मुले करीत असल्यामुळेही या मुलांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असू शकते. त्यासोबतच ज्या लोकांना जीवनात सतत मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. त्यांच्या मानसिक संघर्षांमुळे शरीरातील कित्येत ग्रंथी विशेषत: अ‍ॅड्रिनल ग्रंथी उत्तेजित होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो.मानसिक ताणामुळे कॉटिकोलामाइन्स, अ‍ॅड्रिनालीन व नॉरेअ‍ॅड्रिनालीन या शरीरातील स्रावात वाढ होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. मद्यपान करणाऱ्यांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे अधिक असते. जे लोक जास्त मीठ खातात त्यांनाही याचा धोका असतो. तसेच स्थूलपणा, लठ्ठपणा आणि वाढलेले वजन यांचा उच्च रक्तदाबाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्याचे वजन जितके जास्त, त्याचा रक्तदाबही जास्त असतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स