शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Health tips: दुधीचा रस ठरणार नाही घातक जर 'अशाप्रकारे' केलं सेवन, जाणून घ्या योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:10 IST

दुधी खाल्ल्याने तणाव (Stress) देखील कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला दुधीभोपळा आवडत नसेल तर तुम्ही त्याचा ज्युस करून त्याचं सेवन करू शकता. तर, दुधीचा ज्युस केव्हा प्यावा आणि तो किती प्रमाणात प्यावा, याबद्दल जाणून घ्या.

दुधी भोपळा (Bottle Gourd) अनेकांना आवडत नाही. घरात दुधीभोपळ्याची भाजी असेल तर बरेच जण नाकं मुरडतात; पण या अनेकांच्या नावडत्या दुधीभोपळ्याच्या भाजीत खूप पौष्टिक गुणधर्म आहेत. दुधी वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतो. या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात असतं. दुधी आहारात घेतल्याने हाडं मजबूत होतात. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र, दुधी खाल्ल्याने तणाव (Stress) देखील कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला दुधीभोपळा आवडत नसेल तर तुम्ही त्याचा ज्युस करून त्याचं सेवन करू शकता. तर, दुधीचा ज्युस केव्हा प्यावा आणि तो किती प्रमाणात प्यावा, याबद्दल जाणून घ्या.

ज्युस पिण्याची योग्य वेळ कोणती?दुधीचा रस (Bottle Gourd Juice) म्हणजेच ज्युस पिण्याची उत्तम वेळ सकाळची असते. तुम्ही झोपेतून उठून रिकाम्यापोटी हा ज्युस प्यायलात तर तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल. यामुळे दिवसभर शरीराला शक्ती मिळते. इतर ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात दुधीच्या रसाच्या सेवनाचा खूप फायदा होतो. या ज्युसमुळे शरीर डिटॉक्स (Detox) होतं, म्हणजेच शरीरातून सर्व प्रकारची विषारी द्रव्यं बाहेर पडतात.

दुधीचा ज्युस किती प्रमाणात प्यावा?आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एक ग्लास दुधीचा ज्युस पिणं पुरेसं आहे. यापेक्षा जास्त ज्युस पिण्याची गरज नाही. या ज्युसचं अतिरिक्त सेवनही शरीरासाठी योग्य नसल्याचं ते म्हणतात.

दुधीचा ज्युस पिण्याचे फायदेदुधीच्या रसामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्याचं नियमित सेवन केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसंच उच्च रक्तदाबाच्या (High BP) रुग्णांसाठी दुधी औषधाप्रमाणे आहे. या ज्युसमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधीचा ज्युस (Bottle gourd) देखील अत्यंत गुणकारी ठरू शकतो. दुधीचा ज्युस प्यायल्याने रक्तातील साखर (Blood Sugar) नियंत्रणात राहते आणि वजनही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

तुम्ही रक्तातील वाढलेल्या साखरेसोबतच वाढलेल्या वजनामुळेदेखील त्रस्त असाल तर अशा स्थितीत तुमच्यासाठी दुधीचा ज्युस अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येतही तुम्हाला फायदा होऊ शकतो. केसांसाठी दररोज एक ग्लास दुधीचा रस प्यायल्यास फायदा होतो. केसांची वाढ चांगली होऊन केस अकाली पांढरे होत नाहीत. तर मग आता तुम्ही दुधीची भाजी किंवा ज्युस पिण्याबद्दल योग्य तो निर्णय घेऊ शकाल अशी आशा करूया.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स