शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

Bird Flu मानवांसाठी ठरू शकतो नवा धोका; WHO कडून गंभीर इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 16:39 IST

bird flu : डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जगाने संभाव्य मानवी बर्ड फ्लू साथीच्या रोगासाठी तयार राहावे. कारण H5N1 विषाणू पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होत आहे.

नवी दिल्ली : एच5 एन1( H5N1) म्हणजेच बर्ड फ्लू जगासाठी नवीन समस्या बनू शकते. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जगाने संभाव्य मानवी बर्ड फ्लू साथीच्या रोगासाठी तयार राहावे. कारण H5N1 विषाणू पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये संक्रमित होत आहे. यातून काही प्राण्यांमध्ये प्रकरणेही समोर आली आहेत. अशा स्थितीत प्राण्यांपासून माणसांमध्ये त्याचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.

व्हर्च्युअल ब्रीफिंग दरम्यान, डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी देशांना सस्तन प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाचे बारकाईने निरीक्षण करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, मानवांमध्ये विषाणूचा प्रसार होण्याचा धोका अजूनही कमी आहे, परंतु आम्ही असे गृहीत धरू शकत नाही की ते असेच राहील आणि भविष्यात कोणत्याही बदलांसाठी आपण तयार असले पाहिजे. यूकेमध्ये H5N1 चा उद्रेक झाल्यानंतर डब्ल्यूएचओने हे विधान केले आहे. 

दरम्यान, बर्ड फ्लूची प्रकरणे यूकेमध्ये अनेक प्राण्यांमध्ये दिसून येत आहेत. हा विषाणू पक्ष्यांकडून प्राण्यांमध्ये वेगाने पसरत आहे. H5N1 पूर्वी माणसांमध्ये आढळून आला आहे, परंतु ही प्रकरणे दुर्मिळ आहेत. मात्र, प्राण्यांमध्ये या फ्लूच्या संसर्गाच्या बातम्यांमुळे चिंता वाढली आहे की, H5N1 च्या स्ट्रेनमध्ये काही बदल होऊ शकतात, ज्यामुळे तो मानवांमध्येही पसरण्याचा धोका वाढू शकतो. बर्ड फ्लूवर नियंत्रण मिळवले नाही तर त्याचा प्रसार जगासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला होता.

अमेरिकेत बर्ड फ्लूचा कहरयावर्षी अमेरिकेला बर्ड फ्लूच्या मोठ्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागला आहे. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात 58 मिलियनहून अधिक पोल्ट्री बाधित झाल्या आहेत. वन्य पक्ष्यांमध्ये 6,100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बर्ड फ्लूचे विविध स्ट्रेन मिळून घातक ठरू शकतात, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर हा फ्लू प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरला तर तो कोरोना सारखा साथीचा रोग देखील बनू शकतो. दरम्यान, याची शक्यता फार कमी असली तरी डब्ल्यूएचओने एक अलर्ट जारी करत म्हटले आहे की, बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्षी आणि प्राण्यांवर कडक नजर ठेवावी. ज्यामुळे त्याचा प्रसार थांबवता येईल. वेळीच योग्य ती पावले उचलली नाहीत, तर भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूHealthआरोग्य