शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोविड 19 मधून बऱ्या होणाऱ्या आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये 'हा' आहे सगळ्यात मोठा फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 17:55 IST

CoronaVirus News : या पेशी दोन प्रकारे तयार होत असतात. एका प्रकारे व्हायरसपासून बचावाचे काम होते. तर दुसऱ्या पेशी व्हायरस नष्ट करण्याचे काम करतात. अशा पेशींना किलर सेल्स असं सुद्धा म्हणतात.

बॅक्टेरिया किंवा व्हायरसशी लढण्याची क्षमता प्रत्येकात वेगवेगळी असते. आजारांपासून बचाव करणं हे रोगप्रतिकारकशक्तीवर अवलंबून असतं. एका अभ्यासानुसार कोरोनामुळे होत असलेले मृत्यू आणि कोरोनातून बरे होणारे लोक यांमध्ये मोठा फरक आहे. कारण प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडत असतो. जेव्हा शरीरावर कोणत्याही व्हायरसचं आक्रमण होतं तेव्हा इम्यून सिस्टिम टी सेल्स निर्माण करते. या पेशी दोन प्रकारे तयार होत असतात. एका प्रकारे व्हायरसपासून बचावाचे काम होते. तर दुसऱ्या पेशी व्हायरस नष्ट करण्याचे काम करतात. अशा पेशींना किलर सेल्स असं सुद्धा म्हणतात.

अमेरिकेतील पेन्सिलवेनिया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या गंभीर स्थितीतील रुग्णांमध्ये टी सेल्सचे हे कार्य दिसून आले आहे. शरीरात तीन प्रकारचे 'इम्युनोटाइप्स' असतात.  पहिल्या इम्युनोटाइप्समध्ये काही रुग्णांच्या शरीरात साहाय्याक पेशींची संख्या जास्त असते. त्यामुळे अनेकदा किलर सेल्स दाबल्या जातात. म्हणजेच व्हायरसबाबत कल्पना असतानाही शरीरातील किलर सेल्सची संख्या कमी असते.

दुसऱ्या इम्यूनोटाईपमध्ये किलर सेल्सची संख्या जास्त प्रमाणात असते. म्हणजेच व्हायरसशी लढण्यासाठी या रुग्णांच्या शरीरातील किलर सेल्स एक्टिव्ह असतात. सहाय्यक पेशींची संख्या कमी असते. यामुळे प्रत्येकाच्या शरीरात व्हायरसशी  लढण्याची क्षमता वेगवेगळी असते. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार दुसऱ्या म्यूनोटाईपमध्ये कोरोना व्हायरसने गंभीर स्वरुपात संक्रमित झाल्यानंतरही जीवंत बाहेर येता येऊ शकतं.

तिसऱ्या इम्युनोटाइपमध्ये अशी स्थिती असते. ज्यात कोणत्याही प्रकारच्या टी सेल्सचं उत्पादन होऊ शकत नाही. म्हणजेच व्हायरसशी लढण्याची क्षमता कमी असल्यामुळे व्हायरसचा प्रभाव जास्त असल्यास मृत्यू होऊ शकतो. हा रिसर्च १२५ रुग्णांवर करण्यात आला होता. जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारच्या रोगप्रतिकारकशक्तींबाबत माहिती मिळवता येऊ शकते.

ज्या व्यक्तीला भेटलात तीच व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्यास; संक्रमणापासून कसा कराल बचाव?

Coronavirus : ६ प्रकारच्या कोरोना व्हायरस आजाराची माहिती आली समोर, वाचा कोणता किती घातक?

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या