पावसाळ्यात घरातून पळून जातील डास, फक्त 10 रूपयात करा हे खास उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 09:39 IST2023-06-28T09:38:38+5:302023-06-28T09:39:23+5:30

Get Rid Of Mosquitos : पावसाळ्यात डासांना पळवून लावण्यासाठी हे उपाय एकदा करून बघाच.

Best home remedies to get rid of mosquitoes in Monsoon season | पावसाळ्यात घरातून पळून जातील डास, फक्त 10 रूपयात करा हे खास उपाय!

पावसाळ्यात घरातून पळून जातील डास, फक्त 10 रूपयात करा हे खास उपाय!

Get Rid Of Mosquitos : पावसाला सुरू झाली की, डासांचा हैदोस सुरू होतो. या दिवसात डासांना वाढण्यासाठी मोठी संधी असते. त्यामुळे याच दरम्यान डेंग्यू आणि मलेरियाचा प्रकोपही वाढतो. डासांना पळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण त्याने काही फारसा फरक दिसत नाही. अशात आम्ही काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. केमिकल्स लिक्वीडपेक्षा हे उपाय जास्त प्रभावी आणि सुरक्षित ठरतात. 

अल्कोहोलने पळवा डास - पावसाळ्यात डासांना पळवून लावण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. घरात ज्या ज्या ठिकाणांवर डास लपून राहण्याची किंवा वाढण्याची शक्यता असते तिथे काही थेंड अल्कोहोल शिंपडा. डासांना अल्कोहोलचा डार्क गंध आवडत नाही. ते लगेच पळून जातात.

लसणाने पळवा डास - लसणामध्ये किती फायदेशीर गुण असतात हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. वेगवेगळ्या आजारांना बरं करण्यासाठीही लसणाचा वापर केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, लसणाच्या मदतीने तुम्ही डासांनाही पळवून लावू शकता. लसणामधील सल्फरमुळे डास मरतात. त्यामुळे लसूण लवंगसोबत पाण्यात उकडून घ्या. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाकून स्प्रे करा. डासांना नायनाट होईल.

नीलगिरी तेल - डासांना घरातून पळवण्यासाठी नीलगिरीचं तेलही फार फायदेशीर असतं. एक चमचा नीलगिरीचं तेल आणि तेवढाच लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण शरीरावर लावा. याच्या वासामुळे डास तुमच्या जवळही येणार नाही.

कडूलिंबाचं तेल - नीलगिरीच्या तेलासारखाच डासांना पळवण्यासाठी कडूलिंबाच्या तेलाचाही फायदा होतो. कडूलिंबाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल समान प्रमाणात मिक्स करा. हे तेल रात्री झोपताना शरीरावर लावा. या तेलाने डास तुमच्या जवळ येणार नाहीत.

कापराचा वापर - चांगली झोप येण्यासाठी आणि डासांना पळवून लावण्यासाठी कापूर जाळण्याचा उपायही चांगला आहे. यासाठी घरात कापूर जाळून दारं-खिडक्या काही वेळासाठी बंद करा. नंतर ते उघडा. जमिनीवर बरेच डास तुम्हाला मेलेले दिसतील. 

Web Title: Best home remedies to get rid of mosquitoes in Monsoon season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.