घशात इन्फेक्शन झाल्याचं कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 10:26 AM2020-01-03T10:26:56+5:302020-01-03T10:35:17+5:30

जेव्हाही घशात इन्फेक्शन होतं तेव्हा अनेकजण या समस्येला सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. वातावरण बदलामुळे घशात इन्फेक्शन होतं.

Best home remedies for sore throat or throat infection | घशात इन्फेक्शन झाल्याचं कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय....

घशात इन्फेक्शन झाल्याचं कसं ओळखाल? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय....

googlenewsNext

जेव्हाही घशात इन्फेक्शन होतं तेव्हा अनेकजण या समस्येला सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. वातावरण बदलामुळे घशात इन्फेक्शन होतं. यात ही समस्या वेगवेगळ्या प्रकारची असते. कधी हे इन्फेक्शन होण्याचं कारण वातावरणातील बदल असतं तर कधी धुम्रपान किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शन असतं. अनेकांना तर अनेक दिवस हे इन्फेक्शन राहतं. हे इन्फेक्शन दूर करण्याचे काही घरगुती उपाय देखील आहेत. 

घशात इन्फेक्शन होण्याची कारणे

घशात इन्फेक्शन होण्याची मुख्य कारणे बॅक्टेरिया आणि व्हायरस ही असतात. घशात दोन्ही बाजूने टॉन्सिल्स असतात, जे घशाची सुरक्षा करतात. पण जेव्हा बॅक्टेरिया किंवा व्हायरसचा हल्ला होतो तेव्हा टॉन्सिल्समध्ये सूज येते. घशात इन्फेक्शन झाल्यावर वेदना आणि खवखव होते. 

घशातील खवखव दूर करण्याचे उपाय

गरम पाण्याने गुरळा

घशात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आधी गरम पाण्याने गुरळा करणं फायदेशीर ठरतं. घशात खवखव नेहमीच होत असेल तर गरम पाण्यात थोडं मीठ टाकून गुरळा करावा. गरम पाण्यात मीठ टाकून गुरळा केल्यावर इन्फेक्शन दूर होण्यास मदत मिळते. 

हळद आणि दुधाचा वापर

जर तुमच्या घशात खवखव होत असेल तर दुधात हळद टाकून सेवन केलं पाहिजे. घशात खवखव होण्याचं मुख्य कारण हे इन्फेक्शन असतं. हळदीमध्ये अ‍ॅंटी-बायोटिक गुण असतात ज्याने इन्फेक्शन दूर होतं. रात्री झोपण्याआधी गरम दुधात हळद टाकून सेवन करावं. 

लसणाने घशाची समस्या दूर करा

लसणाने रोगांशी लढण्याची शक्ती अधिक वाढते. तुम्हाला जर घशात पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होत असेल तर लसणाचा डाएटमध्ये समावेश करण्यासोबतच तुम्ही एक लसणाची कळी तोंडात ठेवून चघळू शकता. याने घशाची खवखव लगेच दूर होईल.

घसा दुखत असेल तर वाफ घ्या

घशात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झाल्यावर वेदना होतात आणि घसा जड होतो. अशात गरम पाण्याची वाफ घेणं फायदेशीर ठरतं. वाफ घेतल्याने घशाची खवखव, वेदना दूर होते.


Web Title: Best home remedies for sore throat or throat infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.