शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

दिलासादायक! भारतात २०२१ च्या सुरुवातीला लस येणार; ४४० रुपयांना उपलब्ध होणार, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 16:32 IST

बर्नस्टीनच्या रिपोर्टनुसार जागतिक स्तरावर चार उमेदवार असे आहेत.  जे २०२० च्या शेवटापर्यंत किंवा २०२१ च्या सुरूवातीला लसीचं  अप्रुव्हल घेऊ शकतात.

कोरोना व्हायरसच्या महासंकटाचा सामना भारतासह जगभरातील अनेक देश करत आहेत. भारतात कोरोनाची लस २०२१ च्या सुरूवातील  येईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.  पुण्यातील मोठी लस निर्मीती करणारी कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीया आपली पहिली लस विकसित करण्याच्या प्रयत्नात असेल. ही माहिती  स्ट्रीट रिसर्च आणि ब्रोकरेज फर्म, बर्नस्टीन रिसर्चने गुरुवारी रिपोर्टमध्ये दिली आहे. बर्नस्टीनच्या रिपोर्टनुसार जागतिक स्तरावर चार उमेदवार असे आहेत.  जे २०२० च्या शेवटापर्यंत किंवा २०२१ च्या सुरूवातीला लसीचं  अप्रुव्हल घेऊ शकतात.

वैज्ञानिक भागिदारीच्या माध्यामातून भारत २ लसी तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. या एजेड/ऑक्सफोर्ड वेक्टर लस आणि नोवावॅक्स प्रोटीन सब युनिट लसी आहेत. एसआईआईला आपली क्षमता आणि योग्यतेच्या आधारावर अप्रुव्हलची वेळ, क्षमता आणि मुल्य निर्धारण लक्षात घेऊन व्यावसाईकरणासाठी या २ लसींना प्राध्यान्य देण्यात आलं आहे. या दोन लसीच्या चाचण्यांमधून दिलासादायक  रिपोर्ट समोर आले आहेत. भारतात लस विकसीत झाल्यानंतर संपूर्ण जगासाठी लस तयार करण्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

याशिवाय उत्पादन आणि वितरण यांसारख्या आवाहानांना तोंड देण्यासाठीही तयार असल्याचे तज्ज्ञ म्हणाले.  रिपोर्टनुसार सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीया २०२१ मध्ये ६०कोटी डोस आणि २०२२ मध्ये १०० कोटी डोस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. सरकारी आणि खासगी बाजारात लसीचं प्रमाण ५५:४५ असं असेल. एसआईआई, भारत बायोटेक, बायोलॉजिकल ई  अन्य काही लहान कंपन्या मिळून दरवर्षी मोठ्या संख्येनं लसीचे उत्पादन करतात. कोरोनाची लस तयार करण्याासाठी एसआईआईनं गावी द वॅक्सिन अलायंस आणि बिल एंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसह भागिदारी केली आहे. 

बर्नस्टीनच्या रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार सरकारसाठी प्रति डोस खरेदी मुल्य तीन डॉलर आणि ग्राहकांसाठी सहा डॉलर असणार आहे.  याशिवाय ज्या फार्मा कंपनीज आपल्या लसीवर काम करत आहेत. अशा तीन कंपन्यांबाबत माहिती दिली आहे.   एसआयआयला या भागिदारीतून उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मदत मिळाली आहे.  दोन्ही लसीचें रेग्युलेटरी अप्रुव्हल मिळाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रिक्वालिफिकेशन प्राप्त होऊ शकेल. भारत आणि कमी, मध्यम लोकसंख्याा असलेल्या देशांना २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात लस उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जाणार आहे. असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ७५,७६० रुग्ण आढळून आले. जगभरातील कोणत्याही देशात एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आजवर आढळले नव्हते. त्यामुळे तो विक्रमही आता भारताच्या नावावर जमा झाला आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण आता ७६.२४ टक्के झाले असून, त्यांची संख्या २५ लाखांवर पोहोचली आहे.

देशभरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३३,१०,३२४ झाली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी आणखी १,०२३ जण मरण पावल्याने कोरोना बळींचा एकूण आकडा ६०,४७२ झाला आहे. या आजारातून २५,२३,७७१ जण पूर्णपणे बरे झालेआहेत.

 हे पण वाचा-

लढ्याला यश! भारतात कोरोनाची 2 सर्वात स्वस्त औषधं आली; एक टॅब्लेट 55 रुपयांना

युद्ध जिंकणार! रशियाकडून कोरोना लसीबाबत गुड न्यूज; लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार? 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन