शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

रोज अनवाणी चालून तर पाहा रहाल इतके फीट की 'हे' गंभीर आजार जवळपास फिरकणारही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 18:45 IST

आरोग्याच्या दृष्टीने अनवाणी चालण्याचे बरेच फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामुळे केवळ दृष्टीच सुधारत नाही, तर तणाव देखील कमी होतो.

आरोग्याच्या दृष्टीने अनवाणी चालण्याचे बरेच फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामुळे केवळ दृष्टीच सुधारत नाही, तर तणाव देखील कमी होतो. चला तर, जाणून घेऊया सकाळी अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे…

डोळ्यांची दृष्टी सुधारते.जेव्हा सकाळी सकाळी आपण गवतावर अनवाणी पायांनी चालतो, तेव्हा आम्ही आपल्या शरीराच्या संपूर्ण दबाव पायाच्या बोटांवर पडतो. पायाच्या बोटांवर प्रेशर पडल्याने, डोळ्यांची दृष्टी सुधारते. याशिवाय हिरवेगार गवत पाहून डोळ्यांना आराम देखील मिळतो.

पायांचा व्यायाम होतो.सकाळी अनवाणी पायांनी फिरणे म्हणजे पायांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे पाय आणि गुडघे यांचे स्नायू मोकळे होतात आणि पायांना आराम मिळतो.

तणावातून मुक्तता मिळतेसकाळी अनवाणी पायांने चालण्याने मनाला देखील विश्रांती मिळते. सकाळची ताजी हवा, सूर्यप्रकाश, हिरवळ आपल्या दृष्टीला आणि मनाला ताजेतवाने करते. या वातावरणात फिरण्याने आपल्याला बर्‍याच आरामदायी वाटते आणि व्यक्ती डिप्रेशनपासून देखील दूर राहते.

मधुमेह रुग्णांसाठी लाभदायीमधुमेहासाठी हिरव्यागार गवतामध्ये बसणे, जॉगिंग करणे आणि त्याकडे पाहणे देखील फार चांगले मानले जाते. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये कोणतीही जखम सहजपणे बरी होत नाही. परंतु, जर मधुमेह रूग्ण हिरव्यागार गवतावर अनवाणी चालत असेल आणि नियमितपणे स्वच्छ वातावरणात श्वास घेत असेल, तर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक प्रमाणात होतो आणि या समस्येवर सहज मात करता येते.

हाडे मजबूत होतातआजकाल ठिसूळ सांध्यांमुळे अनेक विकार वाढतात. याचे प्रमुख कारण सुर्यप्रकाशाचा प्रभाव आहे. त्यामुळे सकाळी मोकळ्या हवेत अनवाणी चालल्याने आपोआपच शरीराला आवश्यक  व्हिटामिन डी मिळते. यामुळे हाडाचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते. गर्भवती स्त्रियांसाठी हे व्हिटामिन फारच आवश्यक आहे.

उच्च रक्तदाबाच्या समस्येवर फायदाआपल्याला ज्याप्रमाणे हवा आणि पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे जमिनीशी किंवा मातीशी थेट संपर्क होणे ही देखील आपल्या शरीराची मूलभूत गरज असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना अनवाणी चालण्याचा सल्ला दिला जातो

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह