शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
3
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
4
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
5
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
6
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
7
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
8
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
9
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
10
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
11
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
12
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
13
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
14
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
15
"उत्तम संधी मिळाली तर तू...", प्रिया बापटची उमेशसाठी पोस्ट; 'ये रे ये रे पैसा ३'चं केलं कौतुक
16
Harshaali Malhotra : "मी ६ वर्षांची होते...", बजरंगी भाईजानमुळे रातोरात बदललं 'मुन्नी'चं आयुष्य, १० वर्षांनी झाली इमोशनल
17
Patanjali Foods Stock: डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
18
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
19
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
20
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?

गणेशोत्सवात खा कृष्णा फळ, 'या' रोगांवर जालीम उपाय; आजार आसपास फिरकणारही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 13:50 IST

कृष्णा फळ जांभळ्या रंगापासून पिवळ्या आणि सोनेरी रंगात बदलते. हे चवीला गोड-आंबट असते. कार्ब्स, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, ए, डी, के, ई, लोह, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक पोषक तत्वे या फळामध्ये आढळतात. ही पोषकतत्वे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. 

आपण कधी पॅशन फ्रुट (passion fruit) बद्दल ऐकले आहे का? हे फळ ‘कृष्णा फळ’ म्हणूनही ओळखले जाते. कृष्णा फळ हे ब्राझील (Brazil) मधील फळ आहे, परंतु आज अनेक देशांमध्ये त्याची लागवड केली जात आहे. भारतात नागालँड, केरळ, कर्नाटक, मिझोराम आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये याचे भरपूर उत्पादन घेतले जाते. कृष्णा फळ जांभळ्या रंगापासून पिवळ्या आणि सोनेरी रंगात बदलते. हे चवीला गोड-आंबट असते. कार्ब्स, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन सी, ए, डी, के, ई, लोह, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक पोषक तत्वे या फळामध्ये आढळतात. ही पोषकतत्वे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. 

डायबिटीसकृष्णा फळाचे सेवनामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो.डायबिटीस असणाऱ्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर मानले जाते. या फळामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. हे इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. चसेच कृष्णा फळं खाल्ल्याने डायबिटीसच्या रुग्णांना दीर्घकाळ भूक लागत नाही आणि त्यांचे वजन वाढत नाही.

हृदयरोगकृष्णा फळ हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यात पोटॅशियम, तसेच इलेक्ट्रोलाइट असते, जे हृदय निरोगी ठेवण्याचे काम करते. ते खाल्ल्याने हृदय आपले कार्य अधिक चांगले करते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

ऑस्टियोपोरोसिसहाडांची घनता वाढवण्यास गरजेचे असणारे मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक या फळात आढळतात. त्याच्या सेवनामुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांचा धोका कमी होतो.

दमाअसे म्हटले जाते की जर याच्या सालीचा अर्क वापरला गेला तर दमा आणि श्वासोच्छवासाच्या समस्येमध्ये बराच आराम मिळतो. तसेच फळ देखील रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. परंतु कृष्णा फळ थंड असते, म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचे सेवन करणे योग्य.

रोगप्रतिकारशक्ती वाढवतेकृष्णा फळांमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-क्रिप्टोक्सॅन्थिन आणि अल्फा-कॅरोटीन असते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी कार्य करते. मजबूत प्रतिकारशक्ती असणे शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. तसेच हे फळ लोहयुक्त असल्याने, शरीरात रक्ताचा कमतरता निर्माण होत नाही. याच्या नियमित सेवनाने अ‍ॅनिमियाचा त्रास होत नाही.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfruitsफळेBrazilब्राझील