पेरूच्या पानांचे त्वचेला आणि केसांना होणारे फायदे वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 04:28 PM2019-11-19T16:28:08+5:302019-11-19T16:41:29+5:30

हिवाळा हा ऋतू सुरु झाला, बाजारात इतर फळांसोबतच पेरु हि दिसायला सुरुवात होते.पेरुमध्ये व्हिटॅमीन सी असते. पेरु हे फळ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे.

Benefits of guava leaf good for health | पेरूच्या पानांचे त्वचेला आणि केसांना होणारे फायदे वाचून व्हाल हैराण

पेरूच्या पानांचे त्वचेला आणि केसांना होणारे फायदे वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

हिवाळा हा ऋतू सुरु झाला, कि बाजारात इतर फळांसोबतच पेरु सुध्दा दिसायला सुरुवात होते.पेरुमध्ये व्हिटॅमीन सी असते. पेरु हे फळ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. तसेच त्वचेच्या समस्येपासून ते पोटाच्या तक्रारींपर्यंत अनेक गोष्टींवरील औषध म्हणून त्याचा उपयोग होतो. तसेच अनेक औषधीगुण असलेल्या  पेरु ह्या फळाच्या पानांचे देखील अनेक फायदे आहेत. तुमचे तारुण्य दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी पेरू लाभदायक ठरतो. तसेच दातांचे आणि संपुर्ण शरीराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी पेरू फायदेशीर ठरतो.

१) पेरूची पाने पाण्यासोबत उकळून ते पाणी प्यायल्याने दातांचे आरोग्य उत्तम राहते. दातांच्या समस्यांसाठीही पेरुच्या पानांची पेस्ट उपयुक्त असते. दातांच्या मजबूतीसाठी महत्त्वपुर्ण पर्याय आहे.

२) शरीरातील  गाठींवर पेरुच्या पानांची पेस्ट करुन ती लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे  सूज कमी होण्यास मदत होते. शरीरात विविध कारणांनी झालेल्या गाठींवरील उपाय म्हणूनही पेरुच्या पानांचा वापर केला जातो

३) लठ्ठपणा कमी करण्यासाठीही पेरुची पानं फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होण्यात मदत होते. शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी पेरुची पानं उपयुक्त ठरतात. या पानांचे चूर्ण घेतल्यास त्याचा फरक दिसून येतो.

४) मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरूच्या पानांचे सेवन उपयुक्त ठरते. पेरूच्या पानांचा  रस नियमित घेतल्यास रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यासाठी मदत होते.

५) बऱ्याचदा स्त्रीयांना अंगावरुन पांढरं पाणी जाण्याचा त्रास असतो.  पेरुची पाने या समस्येसाठीही अतिशय गुणकारी ठरतात. रोज सकाळ संध्याकाळ  पेरूच्या  पानांचा रस घेतल्यास  ही समस्या कमी होण्यासाठी फायदा होतो.

(image credit :pinterest.com)

६) पोटाच्या विकारांवर देखील पेरुची पाने उपयुक्त ठरतात. पोटासंबंधी समस्या उद्भवल्यास  पानांचा रस गुणकारी ठरतो. पचन संस्थेवर याचा परीणाम होऊन  पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. एक कप पाण्यात पेरूची पाने टाकून ती उकळून आणि त्याचा रस गाळून तो प्यायल्यास फरक जाणवतो. 

Web Title: Benefits of guava leaf good for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.