ग्लोईंग त्वचेसाठी पार्लरला जाण्यापेक्षा आपल्या स्किन टाईपनुसार घरच्याघरी 'असं' करा फेशियल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 06:14 PM2020-08-19T18:14:31+5:302020-08-19T18:19:30+5:30

कोरोनाची लागण होईल म्हणून पार्लरमध्ये जाण्याचीही लोकांना धास्ती वाटते. तुम्हाला  गणेशोत्सवाआधी त्वचेवर  ग्लो मिळवायचा असेल तर घरच्याघरी ब्लिच आणि फेशियल करून तुम्ही त्वचा उजळदार बनवू शकता.

Beauty Tips : How To do facial at home for Glowing skin | ग्लोईंग त्वचेसाठी पार्लरला जाण्यापेक्षा आपल्या स्किन टाईपनुसार घरच्याघरी 'असं' करा फेशियल

ग्लोईंग त्वचेसाठी पार्लरला जाण्यापेक्षा आपल्या स्किन टाईपनुसार घरच्याघरी 'असं' करा फेशियल

googlenewsNext

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन  ठेपला आहे. कोणताही सण उत्सव आला की आठवडाभर आधी पार्लर आणि सलूनमध्ये एकच गर्दी पाहायला मिळते. सण उत्सावांच्या दिवशी नटून थटून सुंदर दिसावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. सध्या नटण्यापेक्षा  सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची हौस सगळ्यांनाच असते. पण यंदा कोरोनाची माहामारी असल्यामुळे कोरोनाची लागण होईल म्हणून पार्लरमध्ये जाण्याचीही लोकांना धास्ती वाटते. तुम्हाला  गणेशोत्सवाआधी त्वचेवर  ग्लो मिळवायचा असेल तर घरच्याघरी ब्लिच आणि फेशियल करून तुम्ही त्वचा उजळदार बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कमीतकमी सामानात घरच्याघरी कश्याप्रकारे फेशियल करता येईल.

फ्रुट फ्रेशियल

फ्रूट फेशियल हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायद्याचं ठरते. फ्रूट फेशियल फक्त कोणत्याही क्रीमवर अवलंबून नसते. तर ताज्या फळांनीदेखील फ्रूट फेशियलमध्ये मसाज करता येऊ शकतो. ताज्या फळांनी मसाज करताना तुम्ही तुमच्या त्वचेला लागू होत असेल असेच फळ निवडावे. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी केळं, तर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी संत्र, अगदीच कोरडी त्वचा असणाऱ्यांनी स्ट्रॉबेरी आणि पिगमेंटेशन असणाऱ्या त्वचेसाठी पपई वापरावी.

तुम्हाला या फळांचा अगदी जसाच्या तसा वापर करायचा नसल्यास, बाजारामध्ये या फळांचेच फ्रूट फेशियल क्रीमदेखील उपलब्ध असते. क्लिन्झिंग  मिल्कने ५ ते १० मिनिटं मसाज केल्यानंतर चेहरा कापसानं पुसावा. त्यानंतर मसाज क्रीम  लावून १५ मिनिटं मसाज करावी.

फेशियल करताना पहिले तुमचे केस बांधून घ्या. यासाठी तुम्ही हेअरबँडदेखील वापरू शकता. जेणेकरून तोंडावर केस येणार नाहीत. सर्वात पहिल्यांदा चेहरा साफ करण्यासाठी क्लिन्झिंग करावे. घरी क्लिंजर बनविण्यासाठी एका वाटीत २ चमचे दही आणि १ चमचा मध घ्यावा. आता चेहऱ्यावर हा लेप लावून कमीत कमी ५ मिनिट ठेवावे. त्यानंतर चेहरा साफ करून घ्यावा किंवा तुम्ही आयुर,विट्रो या कंपनीचे क्लिन्झिंग मिल्क वापरू शकता. 

त्यानंतर स्क्रब करावं लागेल. घरी स्क्रबर बनविण्यासाठी एक केळं मिक्सरमध्ये १ चमचा दूध, दोन चमचे ओट्स आणि एक चमचा मधाबरोबर वाटून घ्यावे. आता हे तुमच्या चेहऱ्यावर १० मिनिट्सपर्यंत हळूहळू स्क्रब करत राहावा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेची छिद्र उघडली जातात. त्यानंतर मॉईस्चराईजर त्वचेच्या आत जाऊन त्वचेला मऊ आणि मुलायम बनवते. स्क्रबिंगनंतर वाफ घ्या.  स्टिमर नसेल  तर तुम्ही गरम पाणी एका पातेल्यात गरम करून वाफ घेऊ शकता. वाफ घेऊन झाल्यानंतर स्वच्छ टॉवेलनं चेहरा पुसून घ्या. त्यानंतर मसाज क्रिम लावून योग्य दिशेनं त्वचेची मसाज करा. मसाज झाल्यानंतर फेसपॅक लावण्याची वेळ येते.  

केळी आणि पुदीन्याची पाने चांगल्याप्रकारे एकत्र करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक तुम्हा आठवड्यातून दोनदा वापरू शकता.  पुदीन्याच्या पानांमध्ये सॅलिसिलिक अॅसिड आढळतं, ज्याने पिंपल्स दूर होतात. तर लिंबू चेहऱ्यावर एकप्रकारे ब्लीचिंगचं काम करतं.पिंपल्समुळे चेहऱ्यावर डाग झाले असतील तर हा लिंबू आणि पुदीन्या फेसपॅक त्या डागांना कमी करण्याचं काम करतो.

कसा कराल तयार?

लिंबू आणि पुदीन्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी १० ते १२ पुदीन्याची पाने घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिश्रित करा. ही पाने चांगली बारीक करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर काही वेळासाठी लावून ठेवा. पेस्ट कोरडी झाल्यावर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून २ वेळा लावू शकता. 

हे पण वाचा-

केस गळणं थांबण्यासाठी केस धुण्याच्या २० मिनिटं आधी लावा बटाट्याचा रस, मग बघा कमाल

तुम्हीसुद्धा साबणानं चेहरा धुता का? त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी 'हे' दुष्परिणाम जाणून घ्या

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Beauty Tips : How To do facial at home for Glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.