शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

सावधान! जास्त वेळ काम करणे जीवघेणे ठरतेय; WHO चा कोरोना संकटात गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 09:08 IST

WHO Warn on Long working Hours: दीर्घ वेळ कामाच्या परिणामांवरील पहिल्या जागतिक अभ्यासादरम्यान 2016 मध्ये 745,000 लोकांचा जास्त वेळ काम केल्याने हृदयविकाराचा धक्का आणि झटका येऊन मृत्यू झाला आहे. हा अभ्यास जर्नल एन्व्हायरमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाला होता. हे मृत्यू 2000 सालापासून 30 टक्क्यांनी वाढले होते. 

अनेकदा काम टिकविण्यासाठी किंवा काम संपविण्यासाठी तासंतास काम केले जाते. कंपन्यांमध्ये ठरवून दिलेल्या तासांपेक्षा जास्त काम वेळ (Work for long) काम केले जाते. यामुळे वर्षाकाठी, शेकडो, हजारो लोकांचा मृत्यू (Death) होतो. कोरोना महामारीमुळे अशा प्रकारच्या मृत्यूंमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने दिला आहे. (Working long hours is killing hundreds of thousands of people a year in a worsening trend that may accelerate further due to the COVID-19 pandemic)

दीर्घ वेळ कामाच्या परिणामांवरील पहिल्या जागतिक अभ्यासादरम्यान 2016 मध्ये 745,000 लोकांचा जास्त वेळ काम केल्याने हृदयविकाराचा धक्का आणि झटका येऊन मृत्यू झाला आहे. हा अभ्यास जर्नल एन्व्हायरमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाला होता. हे मृत्यू 2000 सालापासून 30 टक्क्यांनी वाढले होते. 

आठवड्याला 55 तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम करणे हे आरोग्यासाठी गंभीर धोक्याचे आहे. असे डब्ल्यूएचओच्या इन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज आणि हेल्थ डिपार्टमेंटच्या संचालिका मारिया नेईरा यांनी सांगितले. कामगारांना, कर्मचाऱ्यांच्या अधिक सुरक्षेसाठी पावले उचलण्यासाठी ही माहिती वापरता येणार आहे. डब्ल्यूएचओ आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने एकत्रित केलेल्या या अभ्यासानुसार जादा वेळ काम केल्यामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक 72 टक्के हे मध्यम वयाचे पुरुष असल्याचे समोर आले आहे. अशा जादा तासाच्या शिफ्टमध्ये काम केल्याने त्यांचा दोन दशकांनी किंवा नंतर मृत्यू झाला आहे. 

दक्षिण-पूर्व आशिया आणि पश्चिम प्रशांत विभागात राहणारे लोक - डब्ल्यूएचओ-परिभाषित प्रदेश ज्यात चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे, अशा देशांत जास्त मृत्यू झाले आहेत. 

या अभ्यासामध्ये 194 देशांची माहिती गोळा करण्यात आली आहे. यामध्ये आठवड्याला 55 किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करणाऱ्यांमध्ये 35 ते 40 तास काम करणाऱ्यांपेक्षा 35 टक्के जास्त स्ट्रोक येण्याचा तसेच 17 टक्के जास्त हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. 9 टक्के लोक जास्त वेळ काम करतात. कोरोना काळामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता डब्ल्यूएचओने वर्तविली आहे.  

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाEmployeeकर्मचारीcorona virusकोरोना वायरस बातम्या