सावधान! जास्त वेळ काम करणे जीवघेणे ठरतेय; WHO चा कोरोना संकटात गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 09:07 AM2021-05-17T09:07:21+5:302021-05-17T09:08:11+5:30

WHO Warn on Long working Hours: दीर्घ वेळ कामाच्या परिणामांवरील पहिल्या जागतिक अभ्यासादरम्यान 2016 मध्ये 745,000 लोकांचा जास्त वेळ काम केल्याने हृदयविकाराचा धक्का आणि झटका येऊन मृत्यू झाला आहे. हा अभ्यास जर्नल एन्व्हायरमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाला होता. हे मृत्यू 2000 सालापासून 30 टक्क्यांनी वाढले होते. 

Be careful! Working long hours is life threatening, killer; WHO warns in corona crisis | सावधान! जास्त वेळ काम करणे जीवघेणे ठरतेय; WHO चा कोरोना संकटात गंभीर इशारा

सावधान! जास्त वेळ काम करणे जीवघेणे ठरतेय; WHO चा कोरोना संकटात गंभीर इशारा

Next

अनेकदा काम टिकविण्यासाठी किंवा काम संपविण्यासाठी तासंतास काम केले जाते. कंपन्यांमध्ये ठरवून दिलेल्या तासांपेक्षा जास्त काम वेळ (Work for long) काम केले जाते. यामुळे वर्षाकाठी, शेकडो, हजारो लोकांचा मृत्यू (Death) होतो. कोरोना महामारीमुळे अशा प्रकारच्या मृत्यूंमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने दिला आहे. (Working long hours is killing hundreds of thousands of people a year in a worsening trend that may accelerate further due to the COVID-19 pandemic)


दीर्घ वेळ कामाच्या परिणामांवरील पहिल्या जागतिक अभ्यासादरम्यान 2016 मध्ये 745,000 लोकांचा जास्त वेळ काम केल्याने हृदयविकाराचा धक्का आणि झटका येऊन मृत्यू झाला आहे. हा अभ्यास जर्नल एन्व्हायरमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाला होता. हे मृत्यू 2000 सालापासून 30 टक्क्यांनी वाढले होते. 


आठवड्याला 55 तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम करणे हे आरोग्यासाठी गंभीर धोक्याचे आहे. असे डब्ल्यूएचओच्या इन्व्हायरमेंट, क्लायमेट चेंज आणि हेल्थ डिपार्टमेंटच्या संचालिका मारिया नेईरा यांनी सांगितले. कामगारांना, कर्मचाऱ्यांच्या अधिक सुरक्षेसाठी पावले उचलण्यासाठी ही माहिती वापरता येणार आहे. 
डब्ल्यूएचओ आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने एकत्रित केलेल्या या अभ्यासानुसार जादा वेळ काम केल्यामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक 72 टक्के हे मध्यम वयाचे पुरुष असल्याचे समोर आले आहे. अशा जादा तासाच्या शिफ्टमध्ये काम केल्याने त्यांचा दोन दशकांनी किंवा नंतर मृत्यू झाला आहे. 


दक्षिण-पूर्व आशिया आणि पश्चिम प्रशांत विभागात राहणारे लोक - डब्ल्यूएचओ-परिभाषित प्रदेश ज्यात चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे, अशा देशांत जास्त मृत्यू झाले आहेत. 


या अभ्यासामध्ये 194 देशांची माहिती गोळा करण्यात आली आहे. यामध्ये आठवड्याला 55 किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करणाऱ्यांमध्ये 35 ते 40 तास काम करणाऱ्यांपेक्षा 35 टक्के जास्त स्ट्रोक येण्याचा तसेच 17 टक्के जास्त हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. 9 टक्के लोक जास्त वेळ काम करतात. कोरोना काळामुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता डब्ल्यूएचओने वर्तविली आहे. 
 

Web Title: Be careful! Working long hours is life threatening, killer; WHO warns in corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.